राजू शेट्टी म्हणतात हे तर घडवून आणलेलं षडयंत्र


पुणे- प्रसिद्ध उद्योगपति मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटके भरलेलं वाहन आढळून आल्याने खळबळ उडाली होती. मात्र, या घटनेला आता राजकीय वळण लागले आहे. दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावरून उद्योगपति अंबानी आणि अदानी हे आंदोलक शेतकरी आणि विरोधकांच्या रडारवर आहेत. त्यामुळे या घटनेला राजकीय रंग प्राप्त झाला असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी , या घटनेला घडवून आणलेले षड्यंत्र आहे असे म्हटले आहे.

राजू शेट्टी म्हणाले, दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. हे आंदोलन केंद्राने पारित केलेल्या तीन कृषि कायद्यांविरोधात आहे. या कायद्यांमुळे अन्नधान्याचा व्यापार 10-20 लोकांपूरता मर्यादित होणार आहे. त्यामध्ये अदानी आणि अंबानी यांची नावे हे आघाडीवर आहेत. अंबानी यांच्या घरासमोर नेमकी याचवेळी स्फोटके सापडतात म्हणजे हे मुद्दामहून घडवून आणले आहे का? असा प्रश्न शेट्टी यांनी उपस्थित केला. जी व्यक्ति शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्य जनतेच्या रोषास पात्र ठरते त्याच्याबद्दल सहानुभूति निर्माण करण्यासाठी घडवून आणलेलं हे षड्यंत्र आहे अशी टीका राजू शेट्टी यांनी केली. एवढी स्फोटके मुंबईत येताना केंद्रीय गुप्तचर यंत्रणा आणि केंद्रीय पोलिस काय करीत होते? असा सवाल करून अशाप्रकारे स्फोटके घराजवळ आणून अदानी- अंबानींना सहानुभूती मिळेल असे त्यांनी समजण्याचे कारण नाही असे शेट्टी म्हणाले.

अधिक वाचा  जरंडेश्वर साखर कारखान्यावर ईडीची कारवाई हे हिमनगाचे टोक- चंद्रकांत पाटील

दिल्लीत सुरू असलेल्या  शेतकरी आंदोलनाला तीन महीने झाले आहेत. 3 महीने एका ठिकाणी शेतकरी बसून राहतात म्हणजे त्यांच्या काहीत वेदना आहेत हे सरकार समजून घेणार नाही का, की आम्ही समजून घेणार नाही, आमचे काही अडत नाही, आंदोलन मोडीत काढू, शेतकाऱ्यांकडे लक्ष देणार नाही असेच सरकार महान्त असेल ती  दुर्दैवाची गोष्ट आहे असे म्हणत आम्ही आता काय करावं या प्रश्नाचं उत्तर सरकारने द्यावे असे ते म्हणाले.

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनात घुसून हिंसाचार करणारे जे लोक होते त्यांना आंदोलकांनी पोलिसांच्या ताब्यात दिले त्या तपासाचे काय झाले? हे सरकारने सांगावे हिंसाचार करणारे आंदोलनात घुसवायचे आणि आपणच आंदोलक शेतकऱ्यांना खलीस्तावादी किंवा आतंकवादी ठरवायचे हे धंदे बंद करा असा टोला त्यांनी लगावला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love