भोंग्याचे राजकारण काय करायचे ते करा आम्हाला रात्रीची वीज दिवसा द्या – राजू शेट्टी


पुणे– भोंग्याचे राजकारण काय करायचे ते करा आम्हाला रात्रीची वीज दिवसा द्या असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत केली. महागाई व शेतकऱ्यांच्या प्रश्नांपासून नागरीकांचे लक्ष दुसरीकडे वळविण्यासाठीच राज्यात पातळीहीन राजकारण सुरु आहे. या परीस्थतीला सर्वच पक्ष जबाबदार असल्याचा आरोपही स्वाभीमानी शेतकरी राजु शेट्टी यांनी केला.

 वीजेच्या भारनियमनाचा फटका शेतकऱ्यांना बसतो, वीज पुरवठ्याच्या नियोजनात महाविकास आघाडी सरकार अपयशी ठरल्याची टिकाही त्यांनी केली. संघटनेच्यावतीने ‘बळीराजा हुंकार’ यात्रेचे आयोजन केले जाणार आहे. यासंदर्भात पत्रकार परीषदेत माहीती देताना, शेट्टी यांनी राज्य सरकार अणि केंद्र सरकारवर जोरदार टिका केली. महिावकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासदर्भातील कायद्यात बदल केला, त्यापाठोपाठ भुमी अधिग्रहण कायदा अक्षिण एफआरपी कायद्यात बदल केले, नैसर्गिक आपत्तीत विमा कंपन्या या शेतकऱ्यांना लुटत असताना आघाडी सरकारने काहीच केले नाही या कारणांमुळेच मी आघाडीतून बाहेर पडलो असे शेट्टी म्हणाले.

अधिक वाचा  गुलाब नबी आझाद यांच्यासह चार नेत्यांना कॉंग्रेसच्या सरचिटणीस पदावरून हटवले

वीज भारनियमानाच्या चर्चेसंदर्भात शेट्टी यांनी राज्य सरकारवर टिका केली. वीज निर्मिती करण्यासाठी पाच ते सहा स्त्रोत वापरले जातात. कोळसा पुरवठा कमी होत असल्याचा दावा आघाडी सरकार करीत असेल तर राज्य सरकारचे नियोजन चुकले आहे. राज्यात वीज निर्मिती ही सरप्लस असताना, इतर कंपन्यांकडून खरेदी का केली नाही ? उन्हाळ्यात वीजेची मागणी वाढत असल्याने वीज खरेदी करार करणे आवश्यक होते. परंतु तसे केले नाही. वीजेवर सर्वांचाच समान अधिकार आहे. शहरी भागात चोवीस तास वीज पुरवठा केला जातो. मात्र, शेतीसाठी केवळ आठ तास वीज पुरविली जाते. आता भारनियमन लागू झाले तर केवळ साडे तीन तासच वीज उपलब्ध होईल. या साडेतीन तासात शेतीला पाणी पुरवठा होऊ शकतो का? शेती करता येईल का ? याची उत्तरे उर्जामंत्र्यांनी दिली पाहीजे. शेतकऱ्यांकडून महावितरण कंपनीने सुमारे दहा हजार कोटी रुपये जमा केले. हे पैसे घेतले आहेत ना मग आता शेतकऱ्याला वीज पुरविलीच पाहीजे असेही त्यांनी नमूद केले.

अधिक वाचा  मोहोळ यांचा निवडणूक अर्ज ही फक्त औपचारिकता : ४ जूनचा निकाल पुणेकरांच्या गर्दीने दाखवून दिला आहे- रूपाली चाकणकर

मशिदीवरील भोंगे अणि हनुमान चालीसा यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापल्यासंदर्भात शेट्टी म्हणाले, “राज्यात शेतकरी, महीला, विद्यार्थी आदी समाज घटकांचे अनेक प्रश्न आहेत. इंधनदरवाढीमुळे महागाई मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या प्रश्नांकडे दुर्लक्ष करण्यासाठीच सर्वच पक्षांकडून पातळीहीन राजकारण सुरु आहे. एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करीत आहे, कपडे काढून टाकण्याची अणि जेलमध्ये टाकण्याची भाषा केली जात आहे. “

“महिावकास आघाडी सरकारने शेतकरी हिताविरुद्ध निर्णय घेतले आहे. यासंदर्भात मी शरद पवार, सोनिया गांधी, राहुल गांधी यांना पत्रेलिहीली आहे. परंतु, त्यांच्याकडून उत्तर मिळाले नाही. मी महाविकास आघाडीतून बाहेर पडलो आहे. आता माझी विधान परीषदेच्या सदस्यपदी जरी त्यांनी नियुक्ती केली तरी ते पद मी स्विकारणार नाही, असे राजू शेट्टी यांनी स्पष्ट केले.

अधिक वाचा  आरक्षणप्रश्नी सर्वपक्षीय बैठक बोलवावी : शरद पवार यांची सूचना, केंद्राने लक्ष घालण्याचे आवाहन

कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीसात काँग्रेसने बाजी मारली याबाबत त्यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी सांगितले की, कोल्हापूर पोटनिवडणुकीत आम्ही कोणतीही भूमिका घेतली नव्हती.कोण जिंकल हारले याने आम्हाला फरक पडत नाही.दोन्ही आघाड्यानी प्रचाराची खालची पातळी गाठली आहे. अशी टिका त्यांनी यावेळी महाविकास आघाडी व भाजपवर केली.एका निवडणूकीतून महाविकास आघाडीचा निष्कर्ष काढता येणार नाही.निवडणूक म्हटलं की कोणी जिंकत असतं कोणी हारत असतं हा मतदारसंघ हा शहरी होता ग्रामीण भागात काय कौल आहे हे बघावं लागेल.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love