त्या तरुणीवर बलात्कार झालाच नाही:अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांतकुमार यांचा खळबळजनक दावा


उत्तर प्रदेश- उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात 19 वर्षीय दलित मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार घटनेचे तीव्र पडसाद देशातील विविध स्तरात उमटत आहेत. उत्तर प्रदेश पोलीस, सरकार मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करून त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. अशातच अतिरिक्त पोलीस महासंचालक प्रशांतकुमार यांनी खळबळजनक दावा केल्याने या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

हाथरस प्रकरणातील तरुणीवर बलात्कार झाला नाही तर हिंसाचार करण्यासाठी अफवा पसरवली, असं प्रशांतकुमार यांनी ट्वीट करून म्हटलं आहे. घटना घडल्यानंतर या युवतीने दिलेल्या जबाबात आपल्यावर बलात्कार झाला नसल्याचे आणि फक्त मारहाण झाल्याचे म्हटले होते असे त्यांनी म्हटले आहे. दरम्यान, बलात्कार  नाही तर मग पोलिसांनी तिचा मृतदेह का जाळला, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  संजय राठोड चुकले असतील तर कारवाई झालीच पाहिजे- राजू शेट्टी