मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, शरद पवार यांचे फोटो मॉर्फ करुन घाणेरड्या व अश्लिल पोस्ट सोशल मिडियावर पोस्ट केल्या प्रकरणी इटेलिक्चुअल फोरम व्हॉटसअ‍ॅप ग्रुप, कोमट बॉईज अँड गर्ल फेसबुक ग्रुप, सीएम देवेंद्र फडणवीस फॅन क्लब यांच्यावर गुन्हा दाखल


पुणे(प्रतिनिधि)— ट्विटर अकाऊंटवर शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या प्रकरणी एका वॉचमनला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. स्वरुप प्रल्हाद भोसले (वय ३५, रा. भिलारेवाडी, मूळ गाव राजेगाव, ता. दौंड) असे अटक केलेल्याचे नाव आहे. न्यायालयाने अधिक तपासासाठी ८ मेपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. दरम्यान, समाजातील वर्गावर्गामध्ये शत्रुत्व निर्माण करण्याच्या उद्देशाने आक्षेपार्ह पोस्ट टाकून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच शरद पवार अशा प्रतिष्ठित  राजकीय व्यक्तिमत्वाच्या लौकिकाला बाधा आणण्याकरिता त्यांचे फोटो मॉर्फ करुन तसेच घाणेरड्या व अश्लिल अशा पोस्ट टाकून बदनामीकारक पद्धतीने प्रसारित करुन बदनामी करणे  तसेच ब्राम्हण व ब्राम्हणेतर जातीमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट टाकल्या प्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात 13 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

अधिक वाचा  मार्क वाढवून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थिनिकडे शरीर सुखाची मागणी: शिक्षकाला चोप देत काढली धिंड

याप्रकरणी आकाश चंद्रकांत शिंदे (वय २४, रा. डावी भुसारी कॉलनी, कोथरुड) यांनी फिर्याद दिली आहे. महाराष्ट्र सायबर पोलिसांकडून वेगवेगळ डिजिटल माध्यमावर कोणी आक्षेपार्ह काही पोस्ट टाकल्यास त्यांची दखल घेऊन त्याचा तपास विविध जिल्ह्यातील पोलिसांकडे सोपविला जातो. पुणे शहर सायबर पोलिसांकडे अशा काही प्रकरणाचा तपास सोपविण्यात आला असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हाके यांनी सांगितले.

स्वरुप भोसले हा मुळचा दौंड तालुक्यातील राहणारा असून पुण्यात वॉचमन म्हणून काम करतो. त्याने ट्विटर अकाऊंटवर शिवाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. एका अकाऊंटवरुन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट पाहण्यात आली. त्या रागातून आपण ही पोस्ट टाकल्याचे त्याने मान्य केले. त्याचे सस्पेंड केलेले ट्विटर अकाऊंट पुन्हा सुरु करुन त्यातील पुराव्याच्या दृष्टीने महत्वाच्या स्क्रीन शॉट्सचे फोटोग्राफ व प्रिंट ताब्यात घेण्यात आल्या आहेत.

अधिक वाचा  सोशल मीडिया, विविध अॅपद्वारे ओळख वाढवत तरुणींना लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्या नातेवाईकांना लष्करात भरतीचे आमिष दाखवून आर्थिक गंडा घालणाऱ्या भामट्याला अटक

आरोपीचा या पोस्ट टाकण्यामागील हेतू तपासणे तसेच त्याचा इतर कोणत्या समाज विघातक गटाशी संपर्क आहे का याचा तपास करण्यासाठी पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी सरकारी वकील ज्ञानेश्वर मोरे यांनी केली. न्यायालयाने आरोपीला ८ मेपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.

महाराष्ट्रातील राजकीय व्यक्तीवर फेसबुक ग्रुप, इटेलिक्चुअल फोरम नावाचा व्हॉटसअ‍ॅप ग्रुप, कोमट बॉईज अँड गर्ल फेसबुक ग्रुप, सीएम देवेंद्र फडणवीस फॅन क्लब, फेसबुक ग्रुप, इन्स्टाग्राम व ट्विटर या समाज माध्यमावर आक्षेपार्ह मेसेज टाकण्यात आले आहेत. समाजातील वर्गावर्गामध्ये शत्रुत्व निर्माण करण्याच्या उद्देशाने आक्षेपार्ह पोस्ट टाकून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच शरद पवार अशा प्रतिष्ठि राजकीय व्यक्तिमत्वाच्या लौकिकाला बाधा आणण्याकरिता त्यांचे फोटो मॉर्फ करुन तसेच घाणेरड्या व अश्लिल अशा पोस्ट टाकून बदनामीकारक पद्धतीने प्रसारित करुन बदनामी केली. तसेच ब्राम्हण व ब्राम्हणेतर जातीमध्ये तेढ निर्माण करणाऱ्या वेगवेगळ्या आक्षेपार्ह पोस्ट टाकणारे नाना पंडित, वैभव पाटील, महेश गहुडले, धनंजय जोशी, सोनाली राणे, जयसिंग मोहन, संदीप पाटील शौर्यन श्रीकृष्ण चोरगे, अतुल अयाचित, राजेंद्र पवार, राज पाटील, मुकेश जाधव यांच्यावर 469, 499, 500, 504, 505 (2), 34 सह माहिती तंत्रज्ञान कायदा 67 नुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.सायबर पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके अधिक तपास करीत आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love