सहायक पोलिस निरीक्षकाच्या आईचा डोक्यात रॉडने वार करून खून


पुणे- पुण्यातील वारजे भागात जेष्ठ महिलेच्या डोक्यात रॉडने वार करून खून करण्यात आला आहे. शाबाई शेलार (वय ६५) असे खून झालेल्या ज्येष्ठ महिलेचं नाव असून तिचा भंगारचा व्यवसाय होता. ही जेष्ठ  महिला साताऱ्याचे सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल अरुण शेलार यांच्या मातोश्री असल्याची समोर आली आहे. दोनच दिवसांपूर्वी तडीपार गुंडाने पोलिस कर्मचाऱ्याची हत्या केल्याची घटना ताजी असताना पोलिस कर्मचाऱ्याच्या आईचा खून झाल्याने काहलबल उडाली आहे.

वारजे भागातील  रामनगर परिसरातील भाजी मंडईजवळ एक मैदान आहे. तिथेच शाबाई शेलार यांचा भंगारचा व्यवसाय आहे. आज पहाटेच्या सुमारास त्या ठिकाणी एक जण भंगार विकण्यासाठी आला होता. त्यावेळी शाबाई शेलार या रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले.

अधिक वाचा  #Sharad Mohol Murder Case : ऑक्टोबर महिन्यातच झाला होता शरद मोहोळ याला मारण्याच्या प्रयत्न?

भंगार विकण्यास आलेल्या सदरील व्यक्तीने घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलीस दाखल झाले, तेव्हा त्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या होत्या. पोलिसांनी शाबाई शेलार यांना तातडीने रूग्णालयात दाखल केले, पण डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले. या हत्येमागील कारण अद्याप समजू शकलेलं नाही, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक शंकर खटके यांनी दिली.

मृत शाबाई शेलार यांच्या कुटुंबीयाबाबत अधिक माहिती जाणून घेतली असता. सातारा येथे कार्यरत असलेले सहायक पोलीस निरीक्षक विठ्ठल अरुण शेलार यांच्या त्या आई असल्याची माहिती समोर आली असल्याचेही खटके यांनी सांगितलं.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love