संजय काकडे यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती

राजकारण
Spread the love

पुणे–माजी राज्यसभा खासदार संजय काकडे यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली असून काकडे यांना नियुक्तीचे पत्र चंद्रकांत पाटील यांनी दिले आहे.

आगामी काळातील पुणे व पिंपरी चिंचवड महापालिकांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही निवड महत्वपूर्ण मानली जात आहे.

“आपण गत काळात राज्यसभेत जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी केलेले कार्य तसेच संसदेतील आपले उल्लेखनीय कार्य अभिनंदनीय आहे.आपल्या राजकीय व सामाजिक कार्याचा तसेच जनसंपर्काचा उपयोग पक्ष संघटन वाढीसाठी निश्चितपणे होईल, याचा मला पूर्ण विश्वास आहे. आपल्या आगामी कारकीर्दीस माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा! ” असा आशयाचे पत्र चंद्रकांत पाटील यांनी संजय काकडे यांना पाठविले आहे.

2014 साली पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर संजय काकडे भाजपसोबत गेले होते. त्यामुळे त्यांना भाजपचे सहयोगी खासदार म्हणून ओळखले जाते. मात्र दुसऱ्यांदा भाजपकडून काकडे यांना राज्यसभेची खासदारकी मिळाली नाही. त्यावेळी काकडे यांची उघडउघड नाराजी लपून राहिली नव्हती. पण आता प्रदेश उपाध्यक्षपदाची माळ गळ्यात टाकून काकडे यांची काही प्रमाणात नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भाजपने केला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *