तडीपार गुंडाने केली पोलिस कर्मचाऱ्यांची गळा चिरून हत्या

क्राईम
Spread the love

पुणे-तडीपार गुंडाने पोलिस हवालदाराची मध्यरात्री एकच्या सुमारास सहाय्यक फौजदाराची गळा चिरून हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. पुण्यातील बुधवार पेठेतील श्रीकृष्ण टॉकीज जवळ ही हत्या झाली. तडीपार गुंडाने पोलिस कर्मचाऱ्यांची हत्या करण्याची मजल गेल्याने पोलिसांचा गुंडांवर वचक राहिला आहे की नाही? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सहाय्यक फौजदार समीर सय्यद (वय 48) असे खून झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. पोलिसांच्या रेकॉर्डवरील तडीपार गुंड प्रवीण महाजन याने हा खून केला आहे. फरासखाना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. प्रवीण महाजन हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारी स्वरूपाच्या पार्श्वभूमीमुळे त्याला मागील वर्षी पुणे शहर आणि जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आले होते. मात्र तडीपारी आदेशाचा भंग करत तो पुणे शहरात आला होता. बुधवार पेठेतील श्री कृष्णा टॉकीज जवळ त्याने मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास पोलीस कर्मचारी समीर सय्यद यांचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केला. खून झाल्याची माहिती मिळताच फरासखाना पोलिस स्टेशनचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळावरून प्रवीण महाजन याला ताब्यात घेतले. खून नेमका कशामुळे झाला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही.

वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलेचाही खून

दुसऱ्या घटनेत राणी (वय 24) या वेश्या व्यवसाय करणार्‍या महिलेचा खून झाला आहे. या महिलेचे पूर्ण नाव अद्याप समोर आले नाही. तिचा खून कोणी आणि का केला हे देखील अद्याप अस्पष्ट आहे. वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी बुधवार पेठेतील घटनास्थळावर हजर असताना तेथूनच काही अंतरावर आणखी एका महिलेचा खून झाल्याचे उघड झाले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन माहिती घेतली असता देहविक्री करणारी महिला राणी (वय 24) हिचा अज्ञात व्यक्तीने खून केला होता. हा खून कोणी आणि कशासाठी केला हे मात्र अद्याप स्पष्ट झालेले नाही. फरासखाना पोलिस अधिक तपास करत आहेत.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *