Assets worth five crores of VIPS company seized

गुंतवणूकदारांच्या फसवणूकप्रकरणी ईडीची पुणे, कोल्हापुरात कारवाई : व्हीआयपीएस कंपनीची पाच कोटीची मालमत्ता जप्त

क्राईम पुणे-मुंबई
Spread the love

पुणे(प्रतिनिधी)– गुंतवणुकीवर जादा परतव्याचे आमिष दाखवून 100 कोटी रुपयांची फसवणूक करणाऱया पुण्यातील व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीची पाच कोटी रुपयांची मालमत्ता मालमत्ता सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) जप्त केली आहे. या कारवाईअंतर्गत ईडीच्या पथकाने पुणे, नाशिक, कोल्हापूर येथील कार्यालयांवर छापे टाकले.

व्हीआयपीएस ग्रुप ऑफ कंपनीच्या पुणे, नाशिक, कोल्हापूर परिसरातील कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. या कारवाईत रोकड, मुदतठेवीच्या पावत्या, दागिने असा पाच कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, अशी माहिती ईडीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. 

व्हीआयपीएस कंपनीचे संचालक विनोद तुकाराम खुटे, संतोष तुकाराम खुटे, मंगेश खुटे (तिघे रा. निर्माण व्हिवा सोसायटी, सिंहगड महाविद्यालयाजवळ, आंबेगाव बुद्रुक), किरण पितांबर अनारसे, अजिंक्मय बडघे यांच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुंतवणुकदारांना जादा परतव्याचे आमिष दाखवून व्हीआयपीएस कंपनीचा संचालक विनोद खुटे आणि साथीदारांनी फसवणूक केली होती. आंबेगाव बुद्रुक परिसरातील कार्यालयाला खुटे टाळे लावून पसार झाला. गुंतवणुकदारांना परतावा दिला नसल्याने शेकडो गुंतवणुकदारांनी पोलिसांकडे तक्रार दिली होती. तपासात खुटे आणि साथीदारांनी 100 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. याबाबत ईडीचे सहायक संचालक रत्नेशकुमार कर्ण (वय 43) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती.

ईडीकडून याप्रकरणात तपास करण्यात येत होता. गेल्या वषी जून महिन्यात ईडीने पुणे, मुंबई, तसेच अहमदाबादमधील व्हीआयपीएस कंपनी, तसेच अहमदाबादमधील ग्लोबल ?फिलेट बिझनेस या वित्तीय संस्थांवर कारवाई केली होती. ईडीच्या मुंबई विभागीय कार्यालायने ही कारवाई केली होती. पीएमएलए (प्रिव्हेंशन ऑफ मनी लाँड्रिंग ऍक्ट) कायद्यान्वये कारवाई केली होती. विनोद खुटेच्या कुटुंबीयँच्या नावे असलेली आठ कोटी 98 लाख रुपयांची मालमत्ता, व्हीआयपीएस आणि ग्लोबल ऍफिलेट बिझनेस कंपनीच्या नावावर असलेल्या पाच सदनिका, दोन मालमत्ता, दोन कार्यालये आणि नगर येथील दोन हेक्टर जमीन जप्त करण्यात आली होती. मार्च महिन्यात ईडीने छापे टाकून 24 कोटी 41 लाख रुपयांची मालमत्ता जप्त केली होती.

फसवणूक प्रकरणाचा मुख्य सूत्रधार विनोद खुटे याने वेगवेगळय़ा नावे दोन वित्तीय संस्था सुरू करुन गुंतवणुकदारांची 100 कोटी रुपयांहून जास्त रकमेची फसवणूक केली होती. हवालाच्या माध्यमातून त्याने ही रक्कम परदेशात पाठविल्याचे तपासात उघडकीस आले होते. आतापर्यंत 70 कोटी 89 लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

फसवणूक प्रकरणाचा मुख्य सूत्रधार विनोद खुटे दुबईत पसार झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. व्हीआयपीएस कंपनी आणि ग्लोबल ?फिलेट बिझनेस कंपनीने गुंतवणुदारांना गुंतवणुकीवर आकर्षक व्याजदराचे आमिष दाखविले होते. विनोद खुटेने परदेशी मुद्रा विनिमय व्यवहार (फा?रेक्स) टेडिंग कंपनी सुरू केली होती. गुंतवणुदारांकडून आलेले पैसे त्याने कान्हा कॅपिटल कंपनीत वळविले होते. त्याने गुंतवणुकादारांकडून आलेले पैसे बनावट कंपनीच्या नावाने उघडलेल्या खात्यात वळविले होते. त्याने जवळपास 100 कोटी रुपयांची रक्कम हवालामार्गे परदेशात पाठविले होते. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *