पुणे पदवीधर निवडणूक:राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अरुण लाड महाविकास आघाडीचे उमेदवार


पुणे- पुणे पदवीधर मतदार संघातून महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अरुण लाड यांना अपेक्षेप्रमाणे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून उमेदवारी जाहीर झाली आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज सकाळी ट्वीट करून ही माहिती दिली.

दरम्यान, माझ्यावर महाविकास आघाडीने जो विश्वास दर्शवला तो मी नक्की सार्थ करून दाखवेन आणि येणाऱ्या काळात पदवीधरांचे प्रश्न मार्गी लावण्यास मी कटिबद्ध राहीन, अशी पहिली प्रतिक्रिया अरुण लाड यांनी दिली आहे. अरुण लाड यांच्या उमेदवारीमुळे पुणे पदवीधर निवडणूकीची प्रमुख लढत भाजपचे संग्राम देशमुख आणि महाविकास आघाडीचे अरुण लाड यांच्यातच होणार आहे. अरुण लाड हेही सांगलीचेच आहेत.ते क्रांती शिक्षण व उद्योग समूहाचे प्रमुख आहेत. राष्ट्रवादीकडून मात्र,अरुण लाड व श्रीमंत कोकाटे शर्यतीत होते. त्यांनी गेल्या दीड वर्षांपासून तयारी सुरु केली आहे. पदवीधरांचे फॉर्म भरणे, गाठीभेटी घेणे त्यांनी सुरु ठेवल्या होत्या परंतु अपेक्षेप्रमाणे अरुण लाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे.   

अधिक वाचा  ‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड - बोंडें'वर गुन्हे दाखल करा : काँग्रेसची मागणी

पुणे पदवीधर मतदार संघाचे कार्यक्षेत्र पुणे, सांगली, सातारा, सोलापूर आणि कोल्हापूर असे आहे. मागच्या वेळी (२०१४)  सारंग पाटील आणि अरुण लाड यांच्यातील मत विभागणीमुळे चंद्रकांत पाटील यांचा निसटता विजय झाला होता. अत्यंत चुरशीने आणि लक्षवेधी ठरलेल्या निवडणूकीत चंद्रकांत पाटील २ हजार ३८० मतांच्या फरकाने विजयी झाले होते. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून खासदार श्रीनिवास पाटील यांचे चिरंजीव सारंग पाटील तसेच अरुण लाड दोघांनीही आपला दावा सांगितला होता. यामध्ये सारंग पाटील यांना संधी मिळाली होती. त्यामुळे अरुण लाड यांनी बंडखोरी केली होती. सारंग पाटील आणि अरुण लाड यांच्या मध्ये आघाडीची मते विभागल्यामुळे दोघांनाही पराभव पत्कारावा लागला होता.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love