लोकशाहीसाठी कुटुंब किंवा कुटुंबातील पक्ष हा सर्वात मोठा धोका – नरेंद्र मोदी

राजकारण
Spread the love

नवी दिल्ली(ऑनलाईन टीम)–भारतीय जनता पक्षाने  बिहार विधानसभा निवडणुका आणि विविध राज्यात झालेल्या पोटनिवडणुकीत दणदणीत यश मिळविले आहे. हे यश साजरे करण्यासाठी बुधवारी सायंकाळी भाजपा मुख्यालयात भाजपच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह इत्यादी नेत्यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आलेल्या या विजयी उत्सवाच्या निमित्ताने कार्यकर्त्यांना संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक विषयांना हात घातला. पंतप्रधान म्हणाले की, बिहारमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुका आणि विविध राज्यांच्या पोटनिवडणुकीचा निकाल दर्शविला आहे की तुम्ही कठोर परिश्रम केले तर जनता आशीर्वाद देईल. ते म्हणाले की, भाजपावरील देशातील जनतेचा विश्वास वाढतो आहे.

आम्ही लोकशाहीला समर्पित आहोत. देशाने आमच्यावर जो विश्वास ठेवला आहे तो पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. आपल्या हेतूंवर कोणीही शंका घेऊ शकत नाही. आमच्या प्रयत्नांमुळे कोणीही कधीही निराश होत नाही.

निवडणुका येतात, जातात, जय- पराजयाचा खेळ होत राहिला आहे. कधी अमुक एक सत्तेत बसेल तर कधी दुसरे कोणी परंतु लोकशाहीमध्ये हा मृत्यूचा खेळ कधीच चालू शकत नाही. देशातील काही भागात काहींना असे वाटते की ते भाजपा कार्यकर्त्यांची हत्या करून त्यांच्या योजना पूर्ण करतील परंतु, मी त्या सर्वांना मनापासून समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो की, मला चेतावणी देण्याची गरज नाही, ते काम जनता- जनार्दनच करेल. जे लोकशाही मार्गाने आपल्याला आव्हान देण्यास सक्षम नाहीत, त्या अशा काही लोकांनी भाजप कार्यकर्त्यांना ठार मारण्याचा मार्ग स्वीकारला आहे.

मी देशातील तरुणांना आवाहन करतो की त्यांनी पुढे येऊन भाजपच्या माध्यमातून देशसेवेसाठी सामील व्हा.  आपली स्वप्ने साकार करण्यासाठी, आपले संकल्प पूर्ण करण्यासाठी, आपल्या हातात कमळ घ्या. अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्षाची जबाबदारी आणखी वाढते.

आम्हाला आमच्या पक्षात लोकशाहीला मजबूत ठेवणे आवश्यक आहे. आम्हाला आमच्या पक्षाला जिवंत लोकशाहीचे जीते- जागते उदाहरण बनवायचे आहे. प्रत्येक कार्यकर्ता आणि प्रत्येक नागरिकासाठी हा पक्ष    एक उत्तम संधीचा मंच असावा. दुर्दैवाने, काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत कौटुंबिक पक्षांचे जाळे लोकशाहीसाठी धोकादायक ठरत आहेत, हे देशातील तरुणांना चांगले समजले आहे.

लोकशाहीसाठी कुटुंब किंवा कुटुंबातील पक्ष हा सर्वात मोठा धोका आहे. एकविसाव्या शतकातील भारत हा एक नवीन मूड असलेला भारत आहे. ना आम्हाला आपत्ती रोखू शकत ना मोठमोठी आव्हाने. मी एका नव्या भारताचा उदय होताना पाहत आहे. असा भारत जो आत्मविश्वासाने भरलेला,  ज्याला आपल्या सामर्थ्याची जान आहे, जो आपल्या ध्येयाविषयी जागरूक आहे.   

आम्ही सर्व भाजप कार्यकर्ते नितीशजी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएच्या कार्यकर्त्यांसह प्रत्येक बिहारवासी हा संकल्प सिद्ध करण्यासाठी कसलीही कसर सोडणार नाही. मी बिहारमधील माझ्या बांधवांना सांगेन, की आपण पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की बिहारला लोकशाहीची भूमी का म्हटले जाते. तुम्ही हे पुन्हा सिद्ध केले आहे की बिहारवासी खरोखरच पारख करणारे आणि जागरूक आहेत.

बिहारमधील विजय हा विकास कामांचा विजय आहे. बिहारमध्ये सत्याचा विजय झाला असून विश्वास जिंकला आहे. बिहारचे तरुण जगतात, माता भगिनी व मुली जगतात, बिहारचा गरीब माणूस जगतो, शेतकरी जगतो आहे.  हा बिहारच्या आकांक्षांचा विजय आणि  बिहारच्या अभिमानाचा विजय आहे.

बिहार तर सर्वात खास आहे. जर तुम्ही मला आज बिहारच्या निवडणुकीच्या निकालांबद्दल विचाराल तर माझे उत्तर लोकांच्या  जनादेशाप्रती स्पष्ट आहे. बिहारमध्ये सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास या मंत्राचा विजय झाल आही.  गुजरातमध्ये 90च्या दशकापासून भाजपा आहे आणि तेथेही या पोटनिवडणुकीत पक्षाने सर्व जागा जिंकल्या.

मध्य प्रदेशातही भाजपला चांगल्या जागा मिळाल्या आहेत.  आमचे सरकार तिथे बर्‍याच वर्षांपासून आहे. म्हणजेच देशातील जनता भाजपवर सर्वाधिक भरवसा ठेवून पुन्हा एकदा भाजपाला संधी देत ​​आहे. भाजपच्या या यशामागे शासन कारभाराचे मॉडेल आहे. लोक जेव्हा कारभाराचा विचार करतात तेव्हा ते भाजपचा विचार करतात. भाजप सरकारांची ओळखच सुशासन अशी आहे.

भाजपच्या प्रती  जनता जनार्दन यांचे प्रेम वाढत आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाने पूर्वीपेक्षा जास्त जागा जिंकून सरकारमध्ये पुनरागमन केले. बिहारमध्ये सरकारमध्ये तीनवेळा राहिल्यानंतर ज्यांच्या जागांमध्ये वाढ झाली आहे असा  भाजप हा एकमेव पक्ष आहे.

आर्थिक सुधारण असो, शेतीविषयक सुधारणा असोत की देशाची सुरक्षा असो, शिक्षण असो, नवीन व्यवस्था असो वा शेतकरी व कामगारांचे हित असो,  या सर्व बाबतीत भाजपच हा एकमेव पक्ष आहे ज्याच्यावर देशाचा सर्वात जास्त भरोसा आहे. हा विश्वास भाजपासाठी, माझ्यासाठी आपल्या प्रधान सेवकासाठी फार मोठी पुंजी आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *