धनंजय मुंडेंच्या बाबतीतले शरद पवार यांचे वक्तव्य जनतेचा भ्रमनिरास करणारे


पुणे–सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर एका महिलेने केलेले आरोप गंभीर आहेत  आणि  या आरोपांची  दखल घेतली जाईल असे शरद पवार म्हणाले होते. पवारांची यापूर्वीची पार्श्वभूमी पाहता ते अशाप्रकरणात कडक धोरण स्विकारतात. पवारांचे 50 वर्षांचे राजकारणात पाहिले तर त्यांच्यातील कोणावर आरोप झाला किंवा त्यांनी कोणाला पाठीशी घातले असे झाले नाही. परंतु कालची त्यांची पत्रकार परिषद पाहता राज्यातील जनतेचा भ्रमनिरास झाला आहे अशी टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. दरम्यान, सामाजिक न्ययमंत्री धनंजय मुंडे यांचे बलात्कार आणि दुसरे पत्नीचे प्रकरण समोर आल्यानंतर त्यांनी नैतिकतेने राजीनामा दिला पाहिजे. यासंर्दभात भाजप महिला मोर्चाच्या वतीने सोमवारपासून (18 जानेवारी) राज्यभरात सर्व तहसील कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालया समोर आंदोलन करण्यात येऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे नावाने निवेदन सादर करुन मुंडे यांचे राजीनाम्याची मागणी केली जाणार आहे अशी माहिती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अधिक वाचा  चोर आले म्हणून पोलिसच पळतात ही केविलवाणी गोष्ट - अजित पवार

पाटील म्हणाले, रेणू शर्मा यांनी केलेल्या आरोपाच्या चौकश्या तुम्ही पोलीस, सीआयडी आणि चालत असेल तर सीबीआयकडून देखील केली तरी आमची काही हरकत नाही. आम्हाला त्यावर काही देणे घेणे नाही. मात्र, धनंजय मुंडे यांनी करूणा शर्मा यांच्यासोबत माझे गेल्या काही वर्षांपासून शारीरिक संबंध होते. तसेच त्यांच्यापासून मला दोन मुले आहेत. त्यांचे पालकत्व स्वीकारले असून त्यांना माझी नावे देखील दिली आहे, या सर्व गोष्टी मान्य केल्या आहेत. परंतू, धनंजय मुंडे यांनी स्वत: कबुली दिल्यावर सुद्धा शरद पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कारवाई का करत नाही? असा सवाल उपस्थित केला आहे. मात्र याच मुद्द्यांवर आमचा आक्षेप असून मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा किंवा पवारांनी तो घ्यावा अशी आमची आग्रही भूमिका असल्याचे आहे. भारतीय समाज हा नीतिमूल्ल्यांवर चालतो असेही ते यावेळी म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love