राजकीय विरोधक असणारे सासरे-जावई झाले विधान परिषद आणि विधानसभेचे अध्यक्ष : राहुल नार्वेकर यांना विधानसभेचे अध्यक्ष करण्यामागे काय आहे भाजपची खेळी?


मुंबई – महाराष्ट्र विधानसभेचे नवे अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. भाजपचे आमदार नार्वेकर यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांचा पराभव केला. राहुल नार्वेकर यांच्या विधानसभेचे अध्यक्ष म्हणून झालेल्या निवडीने एक नवा इतिहास महाराष्ट्राच्या राजकारणात घडला आहे. महाराष्ट्राच्या विधानसभा आणि विधानपरिषदेची जबाबदारी जावई आणि सासरे यांच्याकडे यांच्याकडे आली असून महाराष्ट्राच्या राजकारणातील ही पहिलीच वेळ आहे. विशेष म्हणजे दोघेही राजकीय विरोधक आहेत.

कोण आहेत राहुल नार्वेकर?

राहुल नार्वेकर हे महाराष्ट्र विधानसभेचे नवे अध्यक्ष झाले आहेत. त्यांना भाजप आणि शिवसेनेच्या एकनाथ शिंदे गटाने उमेदवारी दिली होती. राहुल यांचा राजकीय प्रवास शिवसेनेतून सुरू झाला आणि ते युवासेनेचे प्रवक्ते झाले. १५ वर्षे शिवसेनेत राहिल्यानंतर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

अधिक वाचा  फेमिना मिस इंडिया २०२३ ऑडिशनला उदंड प्रतिसाद

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी मावळ मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती, मात्र त्यांना विजय मिळवता आला नाही. २०१९ मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आणि ते कुलाब्यातून आमदार झाले. ४५ वर्षीय राहुल नार्वेकर हे पेशाने वकील आहेत. त्यांचे वडील सुरेश नार्वेकर बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) नगरसेवक होते. त्यांचे बंधु मकरंद हे बृहन्मुंबई महानगरपालिकेत प्रभाग क्रमांक 227 मधून दुसऱ्यांदा नगरसेवक झाले आहेत. वहिनी हर्षता देखील बृहन्मुंबई महानगरपालिकेत वॉर्ड क्रमांक 226 मधून नगरसेवक आहेत.

राहुल हे विधान परिषद सभापतींचे जावई

राहुल हे विधान परिषदेचे सभापती आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर यांचे जावई आहेत. रामराजे निंबाळकर हे सध्या महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष आहेत. रामराजे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे निकटवर्तीय असल्याचे सांगितले जाते. 2015 मध्ये त्यांची विधान परिषदेच्या अध्यक्षपदी निवड झाली. 2016 मध्ये पुन्हा निवडून आले. 1999 ते 2010 या काळात ते महाराष्ट्र सरकारमध्ये विविध मंत्रालयात मंत्रीही होते.

अधिक वाचा  या देशाची खरी संस्कृती ऋषी आणि कृषीची आहे-डॉ. विजय भटकर

राहुल नार्वेकर यांच्या माध्यमातून उद्धव ठाकरे-पवार आणि काँग्रेसला भाजपचा शह

मुंबई महानगरपालिकेत राहुल आणि त्यांच्या कुटुंबीयांचे वर्चस्व आहे. एकनाथ शिंदे हेही बीएमसीचे बादशहा  मानले जातात. अशा स्थितीत भाजपने राहुल यांना विधानसभा अध्यक्ष बनवून महाविकास आघाडी अर्थात शिवसेना (उद्धव ठाकरे गट), राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा मोठा राजकीय पराभव करण्याचा प्रयत्न केला. राहुल यांच्या माध्यमातून भाजप आता राष्ट्रवादीत घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचेही बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहुल यांची पकड चांगली आहे. त्यांचे सासरे हे स्वत: ज्येष्ठ नेते आहेत. अशा स्थितीत राष्ट्रवादीच्या नेत्यांना आपल्या बाजूने आणण्याचा प्रयत्न करून राहुल राष्ट्रवादीला खिंडार पाडू शकतात अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love