Dada is only one, no one else can be Dada

#Sunil Tatkare: दादा एकच आहेत, इतर कोणीही दादा होऊ शकत नाही – तटकरेंचा रोहित पवारांना टोला

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

Sunil Tatkare: राज्यातील लोकसभा(Lok Sabha) मतदारसंघामध्ये बारामती लोकसभा(Baramati Lok Sabha) मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा(ncp) बालेकल्लिा आहे. येथून पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार(Sunetra Pawar) यांनी निवडणूक लढवावी अशी जनतेतून मागणी होत आहे. बारामतीची जागा जिंकण्याचा निर्धार अजितदादांनी केला आहे. ते जे बोलतात ते करतात म्हणून दादा एकच आहेत, इतर कोणीही दादा होऊ शकत नसल्याचा टोला आमदार रोहित पवार यांना राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी लगावला. तर आज राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) पक्षाकडून नैराश्यातून टिका होत असल्याचे त्यांनी नमूद केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अधिकृत मान्यता व पक्ष चिन्ह  मिळाल्यानंतर गुरुवारी पुण्यात सर्व कार्यकारणी सदस्य, सेल, पदाधिकारी,प्रदेश प्रतिनिधी, आजी-माजी आमदार, माजी नगरसेवकांची बैठक पार पडली. याप्रसंगी शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, युवती काँग्रेस शहर सरचिटणीस गौरी पाटील आदी उपस्थित होते.

राष्ट्रवादी काँग्रेस अखंड असताना करण्यात आलेल्या राजकीय खेळीबाबत पत्रकारांनी विचारणा केली असता तटकरे म्हणाले, भाजपबरोबर युती करण्याचा निर्णय यापूर्वी प्रत्येक वेळी नेतृत्वाकडून घेण्यात आला होता. २०१४ च्या निवडणुकीनंतर सर्वांत अगोदर भाजपला बाहेरून पांठिबा देण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी मंत्रीपदेही निश्चित करण्यात आली होती. मात्र नेतृत्वाकडून पुन्हा युटर्न घेण्यात आला होता.

 प्रत्येक वेळी चर्चा होत होती. मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमधील बैठकीतही कार्याध्यक्षपद खासदार सुप्रिया सुळे यांना देण्याचा निर्णय  झाला होता. सर्व काही ठरले असताना पुन्हा वेगळे निर्णय घेतले गेले. त्यामुळे आज रोजी जर कोणी आम्हाला पक्ष आणि चन्हि न मागता दिले असते असे म्हणत असेल तर ते केवळ नैराश्य भावनेतूनच म्हटले जात आहे.

त्याचबरोबर महाविकास आघाडीतील घटक पक्षातून अनेक जण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक आहेत. महायुतीचे मेळावे किंवा बैठकांमधून हे प्रवेश केले जाणार आहेत. १९८० च्या इतिहासाची पुनरावृत्ती होणार असा व्यक्त केला जाणारा विश्वास हा केवळ अदृश्य शक्ती आणि नैराश्याातून मांडला जात असल्याचे तटकरे यांनी नमूद केले. बारामती लोकसभेबाबत अजित पवारांनी जागा जिंकून न आल्यास विधानसभा निवडणूक लढणार नाही अशी घोषणा केलेली नाही, तर अजितदादांनी लोकसभा निवडणूक जिंकण्याचा शब्द दिला आहे तो ते पाळणारच आहेत असेही ते म्हणाले.

अनिल तटकरे दहा वर्षापासून वेगळया पक्षात…

मी लोकसभा निवडणूक लढणार आहे हे निश्चित आहे. त्यामुळे राज्यसभेवर जाण्याचा माझा प्रश्न नाही. निवडणुकीच्या तोंडावर अनिल तटकरे यांचा शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून घेण्यात आला आहे. अनिल तटकरे हे गेल्या दहा वर्षापासून वेगळया पक्षात कार्यरत आहेत. घराघरात विचारधारा ही वेगळी असते. प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे.त्यामुळे त्यांनी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला असेल असे तटकरे यांनी स्पष्ट केले. 

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *