भारताची लोकसंख्यांच देशाला तारेल आणि भारत विश्वगुरू बनेल- डॉ.किरण ठाकूर

India's population will grow the country and India will become the world master
grow the country and India will become the world master

पुणे-  “आतंकवादांचा (terrorism) कोणीही बळी ठरू नये यासाठी देशभक्ती( Patriotism) महत्वाची आहे. २१ वें शतक महिलांचे असून भारताची लोकसंख्यांच (India’s Population) देशाला तारेल आणि भारत विश्वगुरू( Vishwaguru) बनेल. त्यासाठी सर्वांना शिक्षणासाठी प्रचंड कष्ट घ्यावे.” असे आव्हान ६व्या राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाचे((() अध्यक्ष डॉ.किरण ठाकूर (Dr. Kiran Thakur) यांनी केले. (India’s population will grow the country and India will become the world master)

कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट (Karnala Charitable Trust) , पुणेतर्फे आयोजित ६व्या राष्ट्रभक्ती साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी कॉसमॉस कॉपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष प्रवीण गांधी उद्घाटक म्हणून होते. तसेच धर्मादाय सह आयुक्त सु.मु.बुके, डॉ. स्वयंप्रभा मोहिते पाटील, ब्रिगेडियर डॉ. सुनील बोधे व अ‍ॅड. नंदू फडके, कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष व देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने, संमेलनाच्या कार्याध्यक्ष विश्वस्त अ‍ॅड. नंदिनी शहासने व ज्येष्ठ साजसेविका माया प्रभुणे उपस्थित होते. 

अधिक वाचा  राज्यात महिला बचत गटाचे सर्वाधिक जाळे - संजय निरुपम

या प्रसंगी लेखिका चंद्रलेखा बेलसरे यांना ‘कवयित्री उर्मिलाताई कराड जीवन गौरव पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. सन्मानपत्र, पुणेरी पगडी व शाल असे पुरस्काराचे स्वरूप होते. तसेच कर्नाळा चॅरिटेबलची वेबसाईटचे अनावरण व स्मरणीकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

डॉ. किरण ठाकूर म्हणाले,” हजारो सैनिकांच्या बलिदानामुळे हा देश सुरक्षित राहिला. ही गोष्टी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हेरली आणि दिल्लीमध्ये २६ हजार ६७८ सैनिकांचे नाव कोरून त्यांना आदरांजली वाहिली. त्याच आधारे आता क्रांतिकारांच्या जीवनावर कार्य करून त्यांचे स्मारक उभारावे.”

“भारताकडे असलेले १२ लाख सैनिक आणि पाकिस्थानकडे असलेले ७ लाख सैनिक जर एकत्रित झाले तर भारत बलाढय व शक्तीशाली देश बनेल. ही गोष्ट इंग्रजांना मान्य नसल्याने त्यांनी या दोन देशांमध्ये फूट टाकली. तसेच बेचिराख झालेला जपान आणि जर्मन या देशाला उभारून शक्तिशाली बनविण्याची ताकद महिलांनी दिली आहे. त्यामुळे २१ वें शतक हे महिलांचे असेल.”

अधिक वाचा  मुंबई २६/११ च्या हल्ल्यातील शहिदांना पुणे शहर पोलिसांची अनोखी मानवंदना

पुरस्काराला उत्तर देतांना चंद्रलेखा बेलसरे म्हणाल्या, ” सौ. उर्मिला कराड यांच्या नावाचा पुरस्कार स्विकारतांना अत्यंत आनंद होत आहे. पण त्यांचा मायेच्या सहवासाची उणिव जाणवतांना अश्रू थांबविता येत नाही. तन, मन आणि धनाने देशासाठी जो सेवा देतो तोच खरा राष्ट्रभक्त होय. भारत माता…, जय भवानी…सारखे शब्द उच्चारल्यावर पुढील वाक्य आपोआपच आपल्या मुखातून येतात ती राष्ट्रभक्ती आहे. आजच्या मुलांना राष्ट्रभक्तीचे संस्कार देणे गरजेचे आहे.”

 सु.म. बुके म्हणाले,” समता, स्वातंत्र्य आणि बंधुता या गोष्टींवर देशाचे कार्य सुरू आहे. ज्या दिवशी सर्वच क्षेत्रातील लोकांनी कायद्याचे पालन करून व प्रामाणिक कार्य करतील तीच खरी राष्ट्रभक्ती असेल. स्वतःची प्रामाणिक प्रगती केली तर राष्ट्रभक्ती होईल. आजच्या काळात विद्यार्थ्यांना चांगले संस्कार देऊन स्क्रीन अ‍ॅडिक्टपासून दूर ठेवावे.”

अधिक वाचा  सौ.प्रमोदिनी अमृतवाड यांनी आपल्या कार्य कर्तुत्वाने लौकिक मिळविला- आमदार डॉ. सुधीर तांबे

चंद्रकांत शहासने म्हणाले,” समाजाचे काही देणे लागतो ही भूमिका स्वीकारून आज पर्यंत क्रांतिकारांच्या जीवनावर जे काही कार्य केले आहे ते संपूर्ण साहित्य समाजाला लोकार्पण करतो. आपण जे पेराल तेच उगवणार आहे . त्यामुळे सतत राष्ट्रसेवेसाठी कार्य करावे.”

डॉ. स्वयंप्रभा मोहिते पाटील म्हणाल्या,”सुरक्षीत चौकट सोडून महिला घराबाहेर पडते त्यावेळी त्या समाजासाठी काही करतात. आज बेलसरे यांना त्यांच्या कर्तृत्व, दातृत्व, विचारवंत आणि सरस्वतीचा विशेष सन्मान झाला. चिकाटीमुळे त्यांना जीवनात सतत यश मिळत गेले.”

नंदू फडके म्हणाले,” भारत देश बलवान व प्रगतीपथावर असतांना इस्त्राईल सोडून संपूर्ण देश आपल्या विरोधात राहतील. अशा वेळेस देशातील प्रत्येकात प्रखर राष्ट्रभक्ती आवश्यक आहे.”

यावेळी प्रवीण गांधी यांनी विचार मांडले. अ‍ॅड. नंदीनी शहासने यांनी प्रस्ताविक केले.

सौ. जोशी यांनी सूत्रसंचालन व आभार मानले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love