व्यापारी पद्धतीने मत्स्य व्यवसायात रोजगाराच्या संधी : अ‍ॅड. सुभाष मोहिते

Employment opportunities in commercial fisheries
Employment opportunities in commercial fisheries

पुणे-  ” मत्स्य व्यवसाय हा पारंपारिक व्यवसाय असला तरीही अनेक वैशिष्टयांमुळे व आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाल्यामुळे या व्यवसायास विशेष महत्व प्राप्त झाले आहे. रोजगाराच्या समस्या लक्षात घेता युवकांनी नोकरीच्या शोधात शहरात येण्यापेक्षा सरकारी योजना समजून घेऊन त्याचा लाभ घेणे आवश्यक आहे. व्यापारी पद्धतीने मत्स्य व्यवसाय केल्यास मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात.” असे विचार पुणे बँक असोसिएशनचे अध्यक्ष अँड. सुधीर मोहिते यांनी दिला.

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना अंतर्गत लक्ष्मणराव इनामदार नॅशनल अ‍ॅकॅडमी फॉर को ऑपरेटिव्ह रिसर्च अँड डेव्हलपमेंट (लिनॅक), प्रादेशिक प्रशिक्षण केंद्र, एनसीडीसी, पुणे सहकार मंत्रालय, भारत सरकार आणि मत्स्यव्यवसाय विभाग, भारत सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने मत्स्य व्यवसाय उत्पादक सहकारी संस्था बळकट करण्यासाठी निवडक प्राथमिक मत्स्य व्यवसाय सहकारी संस्थांचा अभिमुखता कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. हा कार्यक्रम टिळक रोड येथील डॉ. नितू मांडके सभागृहात संपन्न झाला.

अधिक वाचा  …ही देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक : मुरलीधर मोहोळ

यावेळी मत्स्य व्यवसाय विभागाचे प्रादेशिक उप आयुक्त विजय शिखरे, सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त अर्चना शिंदे आणि सहाय्यक निबंधक सुधीर खंबायत उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नेतृत्व पुणे येथील एनसीडीसीचे उपसंचालक शार्दुल जाधव यांनी केले.

अ‍ॅड सुभाष मोहिते म्हणाले,” मच्छिमारांच्या उत्थानासाठी अशा प्रकारचे प्रशिक्षण आणि विविध सहकारी क्षेत्रातील योजनांचे महत्व सांगितले. तसेच उपस्थित सहकारी संस्थांच्या सभासदांना या योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन केले.”

या वेळी मत्स्य व्यवसाया विभागाच्या अधिकार्‍यानी महाराष्ट्र राज्य शासनाच्या विविध योजनान बाबत मार्गदर्शन केले. शेती व्यवसायासोबत मत्स्य व्यवसाय हा पूरक व्यवसाय केल्यास शेतकर्‍याचे उत्पन्न द्विगुणित होऊ शकते. वाढती लोकसंख्या व त्या सोबतच सुशिक्षीत तरुणांना नोकरीच्या मार्यादित संधी लक्षात घेता मत्स्य क्षेत्रात अनेक व्यवसाय संभावना आहेत

अधिक वाचा  अण्णा भाऊ साठे यांना भारतरत्न दिल्यास पुरस्काराची उंची वाढेल

यामध्ये लहान व मोठ्या धरणामध्ये मत्स्यसवर्धन, मत्स्य बीज पूरवीणे, मत्स्य तलावातील शोभिवंत मास्यांचे संर्वधन, मत्स्यटाकी बनविने व विकणे, मुल्यवर्धीत मत्स्यपदार्थ तयार करणे व विकणे, शास्त्रोक्त पद्धतीने मत्स्य खाद्य निर्मिती व जिवंत मासे विक्री केंद्रासारखे व्यवसाय करू शकतात.”

यावेळी एनसीडीसीच्या अधिकार्‍यांनी एनसीडीच्या विविध योजनांची माहिती दिली तसेच योजना अधिकारी सुरभी मेश्राम यांनी केंद्रीय योजना पीएमएमएसवाय अंतर्गत एफएफपीओ योजनेवरील सत्रात योजनेवरील सत्रात योजनेबद्दल आणि अनुदानांबद्दल सहभागींना माहिती दिली.

आयोजित कार्यक्रमाला प्रशिक्षणार्थींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love