संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज जीवन चरित्र कथा सप्ताहाला उत्स्फूर्त प्रतिसाद : राजेंद्र जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मुक्तांगण लॉन्स येथे आयोजन

पुणे-मुंबई
Spread the love

पिंपरी( प्रतिनिधी)–राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपळे गुरव येथील माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त मुक्तांगण लॉन्स येथे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज जीवन चरित्र कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘कैवल्याचा पुतळा’ विषयावर चरित्र कथाकार ह.भ.प. धर्माचार्य ऍड. शंकर महाराज शेवाळे यांच्या व्याख्यानाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. या सप्ताहाची समाप्ती येत्या सोमवारी असून, ह.भ.प. शेवाळे महाराज यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे.

 ह.भ.प. धर्माचार्य ऍड. शंकर महाराज शेवाळे आपल्या अनुभवसंपन्न विचारवाणीतून रसिकांना मंत्रमुग्ध करीत आहेत. १२ सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या कथा सप्ताहात ज्ञानेश्वरी एकानाथकडून समाजाकडे, ज्ञानदेव पूर्व इतिहास, ज्ञानेश्वर महाराजांचा जन्म, विठ्ठल रुक्मिणी जलसमाधी आदी विषयावर विचार व्यक्त केले. संताचे चरित्र शोधण्यापेक्षा त्यांनी लिहिलेले अभंग, गाथा, भारूड यामधील अर्थ शोधून अनुभव घ्यावा. या जगात आलेली प्रत्येक गोष्ट मनुष्याच्या उपयोगी पडते. मात्र, आपण स्वतःला आणि समाजाला काय देतो याचा विचार करून जगले पाहिजे. जगात कुठलीही गोष्ट चांगली किंवा वाईट नसते, फक्त तिचा वापर कसा केला जातो यावर अवलंबून आहे. त्याचप्रमाणे राजकारणसुद्धा वाईट नसून, स्वतःच्या आणि धर्माच्या रक्षणासाठी ते बचावतंत्र म्हणून वापरता आले पाहिजे, असे प्रतिपादन ऍड. शंकर महाराज शेवाळे यांनी केले.

 यावेळी महाराष्ट्र राज्य वारकरी महामंडळाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष विजूअण्णा जगताप, महामंडलेश्वर डॉ. रामकृष्णदास महाराज लहवितकर, ह.भ.प. स्वामी शिवानंद महाराज, ह.भ.प. राघव चैतन्य महाराज, ह.भ.प. बब्रुवाहन वाघ महाराज, मनःशक्ती केंद्राचे विश्वस्त प्रमोद महाराज शिंदे, आयोजक मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, ह्युमन सोशल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष कैलास बनसोडे, सतीश चोरमले, सुरेखा कदम, सुरेश कदम, विष्णू शेळके, श्री. लक्ष्मण नागरी सहकारी पतसंस्थेचे उपाध्यक्ष सुनील कदम, सुरेश धाडीवाल, साहेबराव तुपे, ह.भ.प. अर्जुन शिंदे, भंडारा डोंगर ट्रस्टचे जगनाथ नाटक पाटील, तसेच कै. गणपतराव जगताप प्रतिष्ठानचे पदाधिकारी, समस्त गावकरी विठ्ठल भजनी मंडळ, काशिदनगर महिला भजनी मंडळ, समस्त ग्रामस्थ पिंपळे गुरव आदी उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजयराज कॉलनी मित्र मंडळाचे अध्यक्ष अभिषेक जगताप, शैलेश दिवेकर, अतुल ससाणे, राजू कोतवाल, नितीन कोल्हे, अनंत दिवेकर, शुभम भोसले, अजिंक्य जाधव यांनी सहकार्य केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *