gtag('js', new Date());
पुणे- मराठा आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात गेला आहे मात्र, या मुद्द्यावरून राजकीय गदारोळ सुरूच आहे. कॉंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी आता मराठा आरक्षणावरून भाजपवर निशाना साधला आहे. मोदी सरकारच मराठा आरक्षणाला अनुकूल नसल्याचे त्यांनी म्हटलं आहे तर राज्यातील महाविकास आघाडी सरकारची भाजप नाहक बदनामी करत असून भाजपच्या नेत्यांनी आग लावण्याचे आणि लोकांना फीतवण्याचे धंदे बंद करावेत असे...
मंत्री पंकजा मुंडेंना अश्लील मेसेज करणारा आरोपी गजाआड
पुणे- आपण परदेशात गेलो असताना भाजपने आमदार सुरेश धस यांना पत्र देऊन राज्याचा दौरा करण्यास सांगितले होते. मला याबाबत नंतर समजलं. परंतु, उसतोड कामगारांच्या संदर्भात सर्व पक्ष एकत्र येतात. लवादावर जे कारखानदार आहेत ते पैसे देणारे कारखानदार ९९ राष्ट्रवादीचे आहेत. त्यामुळे या चळवळीला कधी पक्षीय स्वरूप नव्हतं. भाजपने सुरेश धस यांना पत्र दिल्याने त्याला काही...
पुणे—पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये आज उसतोड कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात झालेल्या बैठकीमध्ये उसतोड कामगारांच्या मजुरीत १४ टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे उसतोड कामगारांना प्रतिटन ४५ ते ५० रुपयांची वाढ मिळाली असल्याचे राज्य साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगावकर यांनी सांगितले. दरम्यान, उसतोड कामगारांचा संप मागे घेण्यात आला आहे.राज्यातील उसतोड कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात...
पुणे(प्रतिनिधी)- भाजपचे आमदार सुरेश धस आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे राजकीय वैर सर्वांना माहिती आहे. आज पुन्हा त्याची प्रचीती आली. राज्यातील उसतोड कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे बैठक झाली.राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार,सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, पंकजा...
मुंबई- मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यानंतर आज पहिली सुनावणी झाली. परंतु, या सुनावणीवरून राज्य सरकारच्या वतीने बाजू मांडणारे महाधिवक्ते मुकूल रोहतगी अनुपस्थित असल्याने काही काळ ही सुनावणी स्थगित करण्यात आली. त्यानंतर पुन्हा सुनावणी होऊन न्यायालयाने ही सुनावणी चार आठवडे पुढे ढकलत हे प्रकरण घटनापीठाकडे मांडण्याचे निर्देश दिले. स्थगिती उठवण्यासंदर्भात राज्य सरकारने काहीच प्रयत्न केल नाहीत...
पुणे- राज्यातील उसतोड कामगारांच्या विविध प्रश्नांसंदर्भात यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, मंत्री बाळासाहेब थोरात, जयंत पाटील, बाळासाहेब पाटील, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आणि भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या उपस्थितीत बैठक सुरु आहे. दरम्यान, या बैठकीला वंचित बहुजन आघाडीला बोलवावे यासाठी आघाडीच्या वतीने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गेटसमोर गाड्या अडवून आणि जोरदार...