राजू शेट्टी यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल


पुणे -शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांना रक्तदाब वाढून अस्वस्थ वाटू लागल्याने येथील दीनानाथ हॉस्पिटल च्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचा निर्वाळा निकटवर्तीयांनी दिला आहे.   

याबाबत माजी खासदार शेट्टी यांचे स्विय सहाय्यक स्वतिक पाटील यांनी पुढाकार घेऊन निवेदन केले आहे. यामध्ये म्हटले आहे की, शेटटी हे गेल्या महिन्यात कोरोनामुक्त झालेनंतर शरीरावर काही दुष्परिणाम झाले आहेत. त्यामुळे तीन महिन्याच्यी सक्तीची विश्रांती घेण्याबद्दल दीनानाथ हाॅस्पीटल मधील डाॅक्टरांनी सुचित केले होते. मात्र पंधरा दिवसांपूर्वी राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मराठवाडा , विदर्भ व कोकणचा दौरा केला. यामध्ये थोडी अस्वस्थता जाणवू लागली होती. दोन तीन दिवसापूर्वी डाॅक्टरांना भेटून तपासणी करणार होते. मात्र पंजाब व हरियाणा येथे शेतकरी आंदोलनातील निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे तेथील आंदोलनानंतर तपासणी करण्याचा निर्णय घेऊन शेट्टी यांनी तीन दिवसाचा दौरा केला. बुधवारी सकाळी ते तपासणीसाठी पुणे येथील दीनानाथ हाॅस्पीटलमध्ये आले.

अधिक वाचा  पाण्याच्या टँकरमध्ये महिलेचा मृतदेह मिळून आल्याने खळबळ

गेल्या पंधरा दिवसातील दौ-यामुळे शारीरीक थकवा निर्माण झाला होता. सकाळी अचानक इलेक्ट्रोकार्डियोग्राम (ई.सी.जी.)मध्ये बदल निर्माण झाल्याने प्रकृती खालावली होती. यामुळे त्यांना तातडीने अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. दीनानाथ रुग्णालयातील दिवसभरामध्ये झालेल्या उपचारामुळे सध्या राजू शेटटी यांची प्रकृती स्थिर असून चिंता करण्याचे कारण नाही. राज्यातील नागरिक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते, राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना आवाहन आहे की, काळजी करण्याचं काहीही कारण नाही. थोड्या विश्रांतीनंतर राजू शेटटी लवकरच आपल्यासोबत पुन्हा कार्यरत होतील. असेही निवेदनात म्हटले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love