दहा किलो गांजा जप्त:पाच जणांना अटक


पुणे–किवळे येथे गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या पाच जणांना देहूरोड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 9 लाख 65 हजार 175 रुपये किमतीचा 10 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

अमोल नारायण आडाल (वय 26, रा. मोरेवस्ती, चिखली), अल्ताफ पाषा तांबोळी (वय 40, रा. कोंढवा बु. पुणे), नईम रफिक शेख (वय 30, रा. थेरगाव), पुरुषोत्तम लक्ष्मण चौघुले (वय 21, रा. काळेवाडी), सुधीर पांडुरंग देवकाते (वय 24, रा. माहीजळगाव, ता. कर्जत, जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत पोलीस शिपाई सचिन श्रीमंत शेजाळ यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गांजा विक्रीसाठी किवळे येथे किवळे ब्रिजखाली सर्विसरोडवर आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी सापळा लाऊन सर्वांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून 9 लाख 65 हजार 175 रुपये किमतीचा 10 किलो गांजा जप्त केला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

अधिक वाचा  खळबळजनक :अल्पवयीन मुलीवर सार्वजनिक शौचालयात बलात्कार

वाकड पोलिसांनी एक हजार रुपये किमतीचा 50 ग्राम गांजा जप्त केला आहे. त्यात पोलिसांनी सुशीला देसाई लष्करे (वय 35, रा. वाकड), अभयकुमार देवेंद्रनाथ परडा (वय 38, रा. वाकड) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी विक्रीसाठी गांजा बाळगल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

source- PCB Today

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love