अभाविपचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये ‘पुंगी बजाव’ आंदोलन


पुणे –आज दि. २९ ऑक्टो रोजी अभाविपच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षेत झालेल्या गोंधळाबाबत जोरदार घोषणाबाजी करत ‘पुंगी बजाव’ आंदोलन करण्यात आले.

परीक्षा पार पडत असताना विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. विद्यापीठाच्या सिस्टीम मधून विधी शाखेचा अंतिम वर्षाचा क्रिमिनल जस्टिस विषयाचा पेपर गायब झालेला आहे, अनेक विद्यार्थ्यांना ऑफलाइन परीक्षा  देत असताना अचानक विद्यापीठ प्रशासनाकडून सांगण्यात आले की तुम्हाला ऑनलाइन परीक्षा द्यावी लागेल, बीए एलएलबी अभ्यासक्रमाबाबत विद्यापीठात पूर्वी देण्यात येणारी बीए ची पदवी मिळणार नाही असे सांगण्यात आले आहे. इंजिनिअरिंगच्या  अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना डिप्लोमाचे गुण गृहीत धरून उत्तीर्ण केले जाईल अशा स्वरूपाचे परिपत्रक विद्यापीठ प्रशासनाने काढले आहे, परंतु अंतिम वर्षाच्या परीक्षा घेऊन देखील अशा पद्धतीचा निर्णय का घेत आहे? अंतिम वर्ष वगळता इतर विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार नाही तरी देखील परीक्षा शुल्क घेण्यात आलेलं आहे.

अधिक वाचा  राज्याचा दहावीचा निकाल ९५.८१ टक्के : यंदाही मुलींचीच बाजी : कोकण विभाग अव्वल

 अशा अनेक समस्यांबाबत मा. कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या कार्यालयात घुसून अभाविपने आज आंदोलन केले यावेळी कुलगुरू विद्यापीठात उपस्थित नव्हते, तेव्हा प्र-कुलगुरू कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्यासाठी आले असता त्यांनी कोणतेच समाधानकारक आश्वासन दिले नाही, त्यामुळे विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी त्यांना घेराव घातला व त्यांची गाडी अडवून जाब विचारला. सकाळी बारा वाजेपासून हे आंदोलन चालू होते अखेर सायंकाळी पाच वाजता कुलगुरू विद्यापीठात आले त्यांनी या सर्व मागण्यांवर नक्की विचार करू व तात्काळ निर्णय घेऊ असे आश्वासन विद्यार्थी परिषदेला दिले. अनेक प्रश्नांबाबत विद्यापीठ प्रशासन विद्यार्थी हिताचा कोणताच निर्णय घेत नाही, तसेच अंतिम वर्षाच्या परीक्षेमध्ये सावळा गोंधळ सुरू आहे यामुळे  विद्यार्थी संभ्रमात आहे.  आपण तात्काळ निर्णय घेतला नाही तर अधिक तीव्र आंदोलन करेल असा इशारा पुणे महानगर मंत्री अनिल ठोंबरे यांनी दिला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love