gtag('js', new Date());
नवी दिल्ली – मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर आज पहिली सुनावणी सर्वोच्च नायालयात होती. मराठा आरक्षण प्रकरण घटनापीठाकडे वर्ग करावं यासाठी ही सुनावणी महत्वाची होती. परंतु, सुरवातीला सरकारी वकिलांची अनुपस्थिती त्यानंतर सुनावणीला काही काळ तहकुबी मग पुन्हा सुनावणी होऊन सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी चार आठवड्यांनी पुढे ढकलत याचिकाकर्त्यांनी त्यांचे म्हणणे घटनापीठाकडे मांडण्याचे आदेश आज दिले.
नवी दिल्ली – सिंगापूर लवादाच्या कोर्टाने रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडला आपला किरकोळ व्यवसाय विक्रीसाठी फ्यूचर ग्रुपवर अंतरिम स्थगिती दिली आहे. दरम्यान, फ्यूचर ग्रुप आणि रिलायन्स रिटेल यांच्यातील कराराबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना रिलायन्सने म्हटले आहे की, हा करार भारतीय कायद्यानुसार झाला आहे आणि या करारापूर्वी कायदेशीर सल्ला घेण्यात आला होतारिलायन्सने माध्यमांच्या निवेदनात...
इंद्राणी बालन फाऊंडेशनच्या वतीने लोणी परिसरात दहा एकर जागेची उपलब्धता झाल्यानंतर सर्व प्रकारच्या खेळांसाठी सुसज्ज स्पोटर्स अकॅडमी उभारण्यात येईल. त्या माध्यमातुन ग्रामीण भागातील मुलांच्या कलागुणांना वाव मिळेल तसेच लोणी गावाचा नावलौकीक राज्यात नव्हे तर संपुर्ण देशात वाढविण्यासाठी ग्रामस्थांच्या सहकार्याने प्रयत्न केला जाईल अशी माहीती इंद्राणी बालन फाऊंडेशनचे अध्यक्ष आणि युवा उद्योजक पुनीत बालन यांनी दिली.
पुणे : "उत्पादन विभागात कामाची जबाबदारी मुलींवर टाकण्याचा सुदर्शन केमिकल्सचा निर्णय धाडसी आहे. उत्तम काम करण्याची मानसिकता, चिकाटी मुलींमध्ये अधिक असते. सुदर्शनने घालून दिलेले हे एक आदर्श उदाहरण आहे. त्यामुळे इतर कंपन्याही महिलांना प्राधान्याने नोकऱ्या देण्याचा प्रयत्न करतील. कागदी पिशव्या बनविण्याचा प्रकल्प, महिला बचत गटांना दिलेले प्रोत्साहन आणि प्लांटमध्ये तिन्ही शिफ्टमध्ये महिलांना दिलेली कामाची संधी यातून महिला...
पुणे- कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर असलेले नियम लक्षात घेऊन यंदा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पुणे महानगरातर्फे महापुरूषांना सघोष मानवंदना व वाद्यपूजन करीत विजयादशमीचा उत्सव साजरा करण्यात आला. दरम्यान यंदा पुणे महानगरात यंदा सघोष पथसंचलने काढण्यात आले नाहीत.विजयादशमीच्या दिवशी सकाळी एकाच वेळेला संपूर्ण महानगरात निघणारी सघोष संचलने, संचलनाच्या मार्गावरून रांगोळ्यांची आरास, फुलांची उधळण करीत...
पुणे- अकरावीची प्रवेश प्रक्रिया चालू नसल्याने अनेक विद्यार्थी मानसिक तणावाखाली आहेत तसेच पालक वर्ग त्रस्त आहे. महाविद्यालयात प्रवेश मिळाला नाही त्यामुळे ऑनलाईन पद्धतीने देखील शिक्षण सुरू झालेले नसून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. शासन अनेक अभ्यासक्रमात कपात करत  असल्याने विद्यार्थी संभ्रमात आहे. त्यामुळे अकरावी प्रवेश प्रक्रिया तत्काळ सुरु करावी अशी मागणी करत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या...