वाहनांच्या काचा फोडून लॅपटॉपसह इतर मौल्यवान ऐवज चोरी करणारी टोळी जेरबंद

क्राईम
Spread the love

पुणे- पिंपरी परिसरात पार्किंग मध्ये थांबलेल्या वाहनांच्या काचा फोडून लॅपटॉपसह इतर मौल्यवान ऐवज चोरी करणाऱ्या टोळीस पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली आहे. .आरोपींच्या ताब्यातून 18 लॅपटॉप, तीन वायफाय डोंगल, एक कॅमेरा लेन्स, सात लॅपटॉप बॅग असा एकूण 12 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

याप्रकरणी बबन काशिनाथ चव्हाण (वय-39,रा.तिऱ्हे तांडा, उत्तर सोलापूर), बसू जगदीश चव्हाण (45,रा.हडपसर, पुणे) व गणेश माणिक पवार (रा.नवी मुंबर्इ) या तीन आरोपींना अटक केली आहे. चोरीचा माल विकत घेलत्याप्रकरणी अमाल गुंड (रा.शिवनी, उत्तर सोलापूर), सुलेमान याकुब तांबोळी (रा.कुमठा नाका, सोलापूर) या दोनजणांना ही अटक करण्यात आली आहे.

पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी परिसरातून सहा ऑक्टोबर रोजी बिल्डींग काॅन्ट्रॅक्टर मिलिंद वेदव्यास राळेगावकर (वय-48,रा.सुसगाव,पुणे) यांच्या होंडा सिटी कारची काच फोडून आरोपींनी 50 हजार रुपयांचा ऐवज असलेली बॅग पळवून नेली होती. या गुन्हयाचा तपास पोलीस करत असताना, पोलीस नाईक वासुदेव मुंडे व पोलीस शिपाई आदिनाथ यांनी घटनास्थळा वरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता त्यांना एक दुचाकीवर संशयित तरुण फिरत असल्याचे दिसून आले. पोलीसांनी 100 पेक्षा अधिक सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करत दुचाकी नंबरची ओळख निष्पन्न करुन त्याचे चालकाची ओळख पटवली असता, सदर दुचाकी ही नवी मुंबईतील आरोपी गणेश पवार याची असल्याचे निष्पन्न झाले. त्याला पोलीसांनी ताब्यात घेत त्याच्या साथीदारांची चौकशी केल्यानंतर हडपसर व सोलापूर येथून दोनजणांना अटक करण्यात आली.

तपासा दरम्यान आरोपींनी कबुली दिली की मागील दीड वर्षाच कालावधीपासून त्यांनी पुणे व पिंपरी चिंचवड शहरातील 25 ते 30 वाहनांच्या काचा फोडून लॅपटॉप रोख रक्कम पळवून नेल्याचे सांगितले. चोरीचे लॅपटॉप आरोपींचे फरार साथीदार राजेश चव्हाण व मारुती पवार यांनी सोलापूर व मुंबर्इ येथे कमी किंमतीत विक्री करत असल्याचे सांगण्यात आले. त्यानुसार पोलीसांनी सोलापूर येथून चोरीचे लॅपटॉप विकत घेतल्या प्रकरणी दोनजणांना अटक केली. जप्त करण्यात अालेल्या 18 लॅपटॉप पैकी सहा लॅपटॉपच्या मूळ मालकांचा शोध लागला असून उर्वरित लॅपटॉप मालकांचा पोलीस शोध घेत आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *