gtag('js', new Date());
 पुणे--नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणी ईडीने काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना आज पुन्हा चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे. यांच्या निषेधार्थ आज पुण्यात काँग्रेस आक्रमक होत बालगंधर्व रंगमंदिराबाहेर टायर पेटवत आंदोलन केले.दरम्यान, यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनाचे नेतृत्व पुणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी केले. या आंदोलनाला...
पुणे बाजार समितीच्या कारभाराची सखोल चौकशी करून दोषींवर तात्काळ कारवाई करा
पुणे- संत तुकाराम महाराज शिळा मंदिर लोकार्पण सोहळय़ात पालकमंत्री अजित पवार यांना बोलण्याची परवानगी देण्यात आली नाही. पंतप्रधान कार्यालयाकडूनच ही परवानगी नाकारली गेली असून, हा महाराष्ट्राचा अवमान असल्याची टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी अमरावती येथे बोलताना व्यक्त केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत तुकाराम महाराज मंदिराचा लोकार्पण सोहळा मंगळवारी...
पुणे—‘उंच नीच काही नेणे भगवंत', यासारख्या अभंगामधून संत तुकाराम महाराजांनी समाजामध्ये उच्च-नीच दृष्टीकोन, माणसा-माणसात भेद करणे हे खूप मोठे पाप असल्याचे म्हटले आहे. त्यांचा हा उपदेश भगवद्भक्तीइतकाच राष्ट्रभक्तीसाठीदेखील महत्त्वाचा आहे. वारकरी बांधवही हा संदेश घेऊन दरवर्षी वारीमध्ये भक्तीचा जागर घडवत असतात. हाच विचार घेऊन आमचे सरकारदेखील कोणताही भेदभाव न बाळगता व सर्वांना सोबत घेत प्रत्येक योजना...
‘हिंसेला चिथावणी देणाऱ्या ‘गायकवाड - बोंडेंवर गुन्हे दाखल करा
पुणे - देशाच्या स्वातंत्र्य संग्रामाचा दीपस्तंभ ‘डेक्कन ह्रेरॅाल्ड’ची स्थापना थोर स्वतंत्रता सेनानी व स्वतंत्र भारताचे १ ले पंतप्रधान पं नेहरूंनी १९३० नव्हे तर १९३७ साली केली असून, हे वर्तमानपत्र ‘पारतंत्र्यातील भारतात’ स्वातंत्र्याची जागरूकता निर्माण करण्याकरता व स्वातंत्र्य संग्रामास प्रेरणा व दिशा देण्याकरीता ३ आवृत्त्यांमध्ये नॅशनल हेरॉल्ड (इंग्रजी), नवजीवन (हिंदी) आणि कौमीआवाज (उर्दू या तीन भाषांमध्ये) सुरू...
पुणे - लष्कर-ए-तोयबा या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात आलेल्या एका तरुणाला पुणे एटीएस पथकाने ताब्यात घेतले आहे. उत्तर प्रदेशमधील सहारनपूर येथून राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) ही कारवाई केली. इनामूल हक (रा. उत्तरप्रदेश) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.लष्कर ए तोएबा या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन जुनैद महंमद (वय २८, सध्या...
पुणे--पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्येमध्ये सहभागी असणाऱ्या पुण्याचा शार्प शूटर संतोष जाधव याच्या मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांना अखेर यश आले आहे. संतोष याला पुणे पोलिसांनी आज उशीरा गुजरात येथून अटक केली असून यापूर्वी त्याचाचसाथीदार सिद्धार्शकां कांबळे (सौरभ महाकाल) याला पुण्यातील नारायणगाव येथून अटक करण्यात आली आहे.संतोष जाधव आणि नवनाथ सुर्यवंशी यांना...