क्राईम
Pune Hooch Tragedy: केवळ ६,६०० रुपयांच्या फायद्यासाठी २२ जणांचा बळी! मुख्य आरोपी वानखेडेचा ‘डेथ प्लॅन’ उघड
News24Pune -0
पुणे(प्रतिनिधी)-- पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडाने शनिवारी संध्याकाळपर्यंत २२ जणांचा बळी घेतला असून, केवळ ६,६०० रुपयांच्या अतिरिक्त फायद्यासाठी मुख्य आरोपी योगेश वानखेडे याने रचलेला हा 'डेथ प्लॅन' असल्याचे तपासात उघड झाले आहे. या भीषण घटनेमुळे राज्यभरात खळबळ उडाली असून, हलगर्जीपणा दाखवणाऱ्या २२ अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे, तर राज्य उत्पादन शुल्क विभागाने तातडीने मोहीम राबवून ६४५...
पुणे-मुंबई
पुढील युद्धे सायबर आणि अंतराळात! भारतीय लष्कर ‘फ्युचर रेडी’ होत असल्याचा लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदींचा दावा
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)-भविष्यातील युद्धे ही केवळ जमीन, पाणी किंवा आकाशापुरती मर्यादित नसून ती सायबर, अंतराळ आणि माहितीच्या (कॉग्निटिव्ह) क्षेत्रात लढली जातील, त्यामुळे या बदलत्या आव्हानांचा सामना करण्यासाठी भारतीय लष्कर आता पूर्णपणे तंत्रज्ञानस्नेही आणि भविष्यासाठी सज्ज ( 'फ्युचर रेडी' ) होत असल्याचे लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी शनिवारी येथे सांगितले. पारंपारिक युद्धभूमीच्या पलीकडे जाऊन आता इलेक्ट्रोमॅग्नेटिक आणि सायबर क्षेत्रातील वर्चस्व महत्त्वाचे ठरणार...
पुणे-मुंबई
NDA Passing Out Parade: एनडीएच्या १५० व्या तुकडीचा दीक्षान्त सोहळा; १८ महिला कॅडेट्सचे ऐतिहासिक ‘अंतिम पाऊल’
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)--पुणे येथील खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (एनडीए) १५० व्या तुकडीचा दीक्षान्त संचलन सोहळा (पासिंग आऊट परेड) अत्यंत उत्साहात आणि लष्करी शिस्तीत शनिवारी पार पडला. उत्तीर्ण होणाऱ्या छात्र सैनिकांना मानवंदना देण्यासाठी आकाशात झेपावणाऱ्या लढाऊ विमानांच्या चित्तथरारक कसरती आणि शिस्त, निष्ठा आणि अजोड देशप्रेमाचे दर्शन घडवणाऱ्या या परेडमध्ये छात्र सैनिकांनी आपल्या संचलनातून उपस्थितांची मने जिंकली. हा सोहळा पाहण्यासाठी देशभरातून आलेल्या...
महत्वाच्या बातम्या
भाजपचा ‘काँग्रेसमुक्त भारत’ की काँग्रेसयुक्त भाजप? : प्राजक्त तनपुरेंच्या भाजप प्रवेशावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)-- "काँग्रेसमुक्त भारत" अशी घोषणा देणाऱ्या भारतीय जनता पक्षाने आज स्वतःच्याच पक्षात काँग्रेसच्या नेत्यांची मोठी भरती केली असून, मूळ भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता आणि संघर्षशील नेते आज कुठे गायब झाले आहेत, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी शनिवारी पुण्यात पत्रकार परिषदेत उपस्थित केला.राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी...
पुणे-मुंबई
पुणे आणि पिंपरी-चिंचवड हादरले! विषारी दारूमुळे १४ जणांचा मृत्यू; पोलिसांची मोठी कारवाई, ८ जण गजाआड
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)--पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील विविध भागांत हातभट्टीची विषारी स्पिरिटयुक्त दारू प्यायल्याने शुक्रवार संध्याकाळपर्यंत १४ नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेक जण मृत्यूशी झुंज देत आहेत. या भीषण घटनेमुळे दापोडी, फुगेवाडी हडपसर आणि काळेपडळ, परिसरात मोठी खळबळ उडाली असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभाग आणि पुणे पोलिसांनी संयुक्त कारवाई करत...
क्राईम
भोर नसरापूर केस: आरोपी भीमराव कांबळे मानसिकदृष्ट्या सक्षम, विशेष न्यायालयात दोषारोप निश्चित
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)--पुणे येथील विशेष न्यायालयाने पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथील साडेतीन वर्षीय बालिकेवरील पाशवी लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणातील आरोपी भीमराव कांबळे हा मानसिकदृष्ट्या सक्षम असल्याचे स्पष्ट करत त्याच्यावर दोषारोप निश्चित केले आहेत. या संवेदनशील प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांनी या खटल्याची सुनावणी 'इन-कॅमेरा' (बंद खोलीत) आणि फास्ट ट्रॅक पद्धतीने घेण्याचे महत्त्वपूर्ण आदेश गुरुवारी...













