gtag('js', new Date());
करिअर मार्गदर्शन पुणे (Career Guidance Pune)
पुणे(प्रतिनिधी)--कोकण मराठा नवनिर्माण सेवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीने दिनांक ३१ मे २०२६ रोजी स्काऊट ग्राउंड, सदाशिव पेठ, पुणे येथे समाजातील इयत्ता ७ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी "करिअर मार्गदर्शन" या विषयावर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला. हा उपक्रम विद्यार्थी व पालकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे अत्यंत यशस्वीरीत्या पार पडला.या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. उदय कुमार (एम.टेक.), संचालक – कुमार क्लासेस, कोथरूड...
पुण्यात सूर्यकांत मांडरे यांच्या जन्मशताब्दी वर्षाची दिमाखात सांगता
पुणे(प्रतिनिधी)- किशोरवयात मी सूर्यकांत यांना प्रथम पाहिले, तेव्हा भारल्याप्रमाणे झाले होते. काही काळाने रूपेरी पडद्यावर मी त्यांची नायिका होईन, असे स्वप्नातही वाटले नव्हते. सूर्यकांत यांच्यासारख्या कलाकारासोबत मला काम करण्याची संधी मिळाली, हा मला भाग्ययोग वाटतो, असे उद्गार ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे यांनी मंगळवारी येथे काढले. सूर्यकांत अभिनेते म्हणून तर श्रेष्ठ होतेच, पण माणुसकीच्या नात्यानेही ते महान होते, असेही त्या...
निवडणूक प्रक्रियेतील घोडेबाजार थांबवण्यासाठी सुप्रिया सुळे संसदेत मांडणार खाजगी विधेयक
पुणे(प्रतिनिधी)--'लाडकी बहीण' योजनेसाठी सरकारच्या वेबसाईटवर लाभार्थी महिलांची संख्या १ कोटी १२ लाख दिसत असताना, सरकार १ कोटी ७ लाख महिलांनाच पैसे मिळाल्याचे सांगत आहे. या संख्येतील तफावत आणि निकषात न बसणाऱ्यांना मिळालेले पैसे हा 'इलेक्टोरल भ्रष्टाचार' असून सर्व शिक्षा अभियान आणि आरटीई साठी असलेला निधी वळवून तो ‘लाडकी बहिण’ योजनेसाठी वापरला जात असल्याचा   आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी मंगळवारी...
काकडे विरुद्ध श्रीकांत पाटील थेट सामना!
पुणे(प्रतिनिधी)--पुणे स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत पुण्याच्या राजकीय वर्तुळात अभूतपूर्व 'हायव्होल्टेज' ड्रामा पाहायला मिळाला. महायुतीमध्ये बंडखोरीचे प्रमाण वाढल्याने आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (अजित पवार गट) उमेदवारीवरून पेच निर्माण झाल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. अखेर, खासदार पार्थ पवार यांनी मंगळवारी यशस्वी मध्यस्थी केल्यानंतर शहराध्यक्ष सुनील टिंगरे यांनी आपली नाराजी बाजूला सारून निवडणुकीतून...
पुणे विधान परिषद राष्ट्रवादी उमेदवारी नाट्य
पुणे(प्रतिनिधी)--पुणे विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये उमेदवारीवरून मोठे राजकीय नाट्य पाहायला मिळाले. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी पक्षाने अधिकृतरीत्या विक्रम संजय काकडे यांचे नाव जाहीर केले असले, तरी माजी आमदार सुनील टिंगरे यांनीदेखील आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. एक जागा आणि दोन उमेदवार, अशा विचित्र परिस्थितीमुळे राष्ट्रवादीतील अंतर्गत...
HDFC Bank MSRDC Scam
बँकिंग क्षेत्रात ज्या बँकेचे नाव आजवर सुरक्षितता, पारदर्शकता, कडक नियमपालन आणि व्यावसायिक शिस्तीसाठी अत्यंत आदराने घेतले जायचे, त्याच एचडीएफसी बँकेच्या उच्च व्यवस्थापनाने सरकारी ठेवी मिळवण्यासाठी आखलेली एक गुप्त आणि संशयास्पद खेळी आता चव्हाट्यावर आली आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) हजारो कोटी रुपयांच्या सरकारी ठेवी आपल्याकडे खेचून आणण्यासाठी बँकेने 'मार्केटिंग खर्च' आणि 'रस्ते सुरक्षा मोहिमेच्या प्रायोजकत्वाचा' जो मुखवटा...