gtag('js', new Date());
पुणे--मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. अशा वेळी उद्धव राज हे दोघे भाऊ एकत्र येतील काय? या प्रश्नावर, 'उद्धव ठाकरे यांची साद आली, तर येऊ देत; मग बघू, असे उत्तर राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे यांनी पुण्यात पत्रकारांना दिले.शर्मिला ठाकरे रविवारी पुण्यात एका वस्त्रदालनाच्या उद्घाटनासाठी आल्या...
पुणे--लाडक्या गणरायाचे आगमन अवघ्या आठवडाभरात येऊन ठेपले आहे अनेक. ठिकाणी गणपती बाप्पाचे आगमन झाले असून देखाव्याची तयारी देखील सुरू झाली आहे. मात्र, पुण्यात एका देखाव्यावरूनच गोंधळ निर्माण झाला आहे. पुण्यातील एका गणेशोत्सव मंडळाला अफजलखान वधाचा देखावा सादर करायचा आहे. गणेशोत्सवात अफजलखानाचा वधाचा देखावा सादर करण्यास या मंडळाला पुणे पोलिसांनी विरोध केला आहे. कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न...
पुणे : पुण्यात एक धक्कादायक प्रकार घडल्याचे समोर आले आहे. घरामध्ये सुख, शांती नांदावी, व्यवसायात भरभराट व्हावी आणि पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून पती, सासू, सासरे यांनी अघोरी पूजा करीत सुनेला सर्वांसमोर आंघोळ करायला लावली आहे. या प्रकरणी पुण्यातील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये पती, सासू, सासरे, मांत्रिक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे--स्वातंत्र्याच्या या अमृतकाळात नव्या भारताचा उदय होत असून भारताचा हा उदय अन्य राष्ट्रांवर वर्चस्व गाजविण्यासाठी नाही तर जगाला प्रेरणा देण्यासाठी होत आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते, खासदार डॉ. सुधांशू त्रिवेदी यांनी शनिवारी केले.विश्व संवाद केंद्र आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणाऱ्या आद्य पत्रकार देवर्षी नारद...
नवी दिल्ली – दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयचा छापा म्हणजे चांगले काम थांबवण्याचा कट असल्याचे म्हटले आहे. आपल्या मुद्द्याच्या समर्थनार्थ, त्यांनी दिल्लीच्या शिक्षण मॉडेलवर अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाईम्सच्या पहिल्या पानावर प्रकाशित झालेल्या बातमीचा हवाला दिला, ज्यामध्ये सिसोदिया यांच्या कार्याचे कौतुक करण्यात आले आहे. ज्या दिवशी संपूर्ण जगाने दिल्लीच्या...
Fadnavis challenges the opposition to an open debate
पुणे--भाजपने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय निवडणूक समितीत स्थान दिल्यानंतर आता फडणवीसांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी. अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून केली आहे.अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून ही मागणी...