Come to Ayodhya on January 22 if you dare

फडणवीसांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी : ब्राह्मण महासंघाची जेपी नड्डांकडे मागणी

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे–भाजपने राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रीय निवडणूक समितीत स्थान दिल्यानंतर आता फडणवीसांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी. अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून केली आहे.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे.

या पत्रामध्ये ब्राह्मण महासंघाने म्हटले आहे की , महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निवडणूक समितीमध्ये समावेश केल्याबद्दल तुमचे अभिनंदन. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे अत्यंत कार्यक्षम व्यक्तिमत्व आहेत, हे त्यांच्या गेल्या पाच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात सिद्ध झाले आहे. फडणवीस हे भाजपचे भविष्य असन नरेंद्र मोदी यांच्यानंतर भारतीय जनता पक्षाला सक्षम नेतृत्व देऊ शकतील अशा दोन्ही तीन नावांमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे नाव ठळकपणे घ्यावे लागेल.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने 2006 ला काँग्रेसचे सुरेश कलमाडी, 2014 ला भाजपचे अनिल शिरोळे आणि २०१९ ला भाजपचे गिरीश बापट यांच्यासोबत राहिला आणि निकाल तुमच्या समोर आहे. मी या पत्राद्वारे तुम्हाला विनंती करू इच्छितो की देवेंद्र फडणवीस यांच्या राष्ट्रीय नेतृत्वासाठी पुणे हे अत्यंत सुरक्षित ठिकाण आहे.

भारतीय जनता पक्षाच्या परंपरेत अटलबिहारी वाजपेयी नरेंद्र मोदीजी यांचे नेतृत्व अबाधित ठेवण्याचे काम देवेंद्रजी करत राहतील. असा आम्हाला विश्वास आहे. अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ कोणत्याही पक्षाशी संबंधित नाही, तरीही राष्ट्रहितासाठी आमची ही विनंती आहे. पुणे लोकसभा जागेसाठी आपण देवेंद्रजींचे नाव जाहीर करून त्यांचा योग्य सन्मान कराल असा विश्वास जे पि नडा यांना पाठवल्या पत्राद्वारे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने व्यक्त केला.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *