अफजलखान वधाचा देखावा सादर करण्यास गणेश मंडळाला परवानगी नाकारली

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे–लाडक्या गणरायाचे आगमन अवघ्या आठवडाभरात येऊन ठेपले आहे अनेक. ठिकाणी गणपती बाप्पाचे आगमन झाले असून देखाव्याची तयारी देखील सुरू झाली आहे. मात्र, पुण्यात एका देखाव्यावरूनच गोंधळ निर्माण झाला आहे. पुण्यातील एका गणेशोत्सव मंडळाला अफजलखान वधाचा देखावा सादर करायचा आहे. गणेशोत्सवात अफजलखानाचा वधाचा देखावा सादर करण्यास या मंडळाला पुणे पोलिसांनी विरोध केला आहे. कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न उपस्थित करत मंडळाने देखाव्याला परवानगी नाकारली आहे.

देखावे हे गणोशोत्सवाचे प्रमुख आकर्षण असते. विविध सामाजिक, प्रबोधनात्मक तसेच ऐतिहासीक विषयांवरील देखावे गणेश मंडळ सादर करतात. पण्यातील एका गणेश मंडळाने पुणे पोलिसांनी फजलखान वधाचा देखावा सादर करण्याची परवानगी मागीतली. मात्र, पुणे पोलिसांनी परवानगी देण्यासा नकार दिला आहे.

 पुण्यातील संगम तरुण मंडळाने अफजलखान वधाचा जिवंत देखावा सादर करण्यासाठी कोथरूड पोलिसांकडे परवानगी मागितली. दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी फजलखान वधाचा देखावा सादर करण्यासा नकार देत परवानगी नाकारली आहे. पोलिसांनी परवानगी नाकारली तरी संगम तरुण मंडळा देखावा सादर करण्यावर ठाम आहे.

संगम तरुण मंडळा मंडळाचे अध्यक्ष किशोर शिंदे यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. अफजलखान वधाचा देखावा दाखवण्यास पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. यामुळे हे मंडळ नाराज झाले आहे. देखाव्याची परवानगी मिळवण्याचा निर्धार या मंडळांनी व्यक्त केला आहे. याप्रकरणी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागणार असल्याचे मंडळाचे अध्यक्ष किशोर शिंदे यांनी सांगीतले.

गणेशोत्सवासाठी ‘अफजलखानाचा वध’ या विषयावरील जिवंत देखावा सादर करण्यात येणार असून त्यासाठी परवानगी द्यावी, अशा मागणी संगम तरुण मंडळाने पत्राद्वारे कोथरूड पोलिसांकडे केली होती.११  ऑगस्ट रोजी मंडळाने पोलिसांना पत्र पाठवले होते. दरम्यान, कोथरूड पोलिसांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसमवेत चर्चेनंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, म्हणून हा देखावा सादर करण्यास परवानगी नाकारली. परवानगी नाकारल्याचे पत्र पोलिसांनी मंडळाचे अध्यक्ष किशोर शिंदे यांना पाठविले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *