देश-विदेश
१९५० नंतरचा सर्वाधिक शक्तिशाली ‘एल निनो’ सक्रिय; भारतीय मान्सूनवर दुष्काळाचे सावट, डिसेंबरमध्ये घेणार रौद्ररूप
News24Pune -0
नवी दिल्ली : प्रशांत महासागरामध्ये 'एल निनो' नैसर्गिक स्थिती अधिकृतपणे सक्रिय झाली असून, तो १९५० नंतरचा सर्वाधिक तीव्र एल निनो असण्याची भीती हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. अमेरिकी हवामान संस्था 'नोवा' (NOAA) आणि क्लायमेट प्रेडिक्शन सेंटरने (CPC) या संदर्भात अधिकृत घोषणा केली असून, याचे दूरगामी परिणाम भारतीय मान्सून आणि एकूणच जागतिक हवामानावर होणार आहेत. यावर्षीचा एल निनो इतका शक्तिशाली...
क्राईम
पिंपरी-चिंचवड पोलिसांची मोठी कारवाई: आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी टोळीचा सूत्रधार बँकॉकहून गजाआड
News24Pune -
पुणे(प्रतिनिधी)--दुबई आणि बँकॉक येथे बसून भारतातील हजारो नागरिकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर गुन्हेगारी सिंडिकेटचा पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या टोळीचा मुख्य सूत्रधार सौरभ उर्फ गणेश बाळासो काळे याला थायलंडमधील बँकॉक विमानतळावर अटक करण्यात आली असून, ११ जून २०२६ रोजी मुंबई विमानतळावर त्याला अधिकृतपणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.चीनशी हातमिळवणी अन् कोट्यवधींची लूटपोलिसांनी केलेल्या तांत्रिक तपासात धक्कादायक माहिती...
महत्वाच्या बातम्या
पुणे: पेपरफुटीविरोधात ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे सावित्रीबाई फुले विद्यापीठात भव्य आंदोलन, शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
News24Pune -पुणे(प्रतिनिधी)- परीक्षेचा पेपर फुटल्यास प्रत्येक विद्यार्थ्याला शासनाकडून दहा हजार ऊपये आर्थिक नुकसानभरपाई मिळावी, परीक्षा आयोजित करण्यासाठी टेंडर घेणाऱ्या कंपन्यांचे कडक ऑडिट व्हावे, मंत्र्यांच्या नातलगांना वा जवळच्या मित्रांना अशी टेंडर मिळता कामा नयेत तसेच एनसीईआरटीच्या पाठ्यापुस्तकातून वगळलेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या ‘हिंदवी साम्राज्याचा नकाशा’ पुन्हा समाविष्ट करण्यात यावा, यांसह अन्य मागण्यांचे ठराव कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनात गुरुवारी मांडण्यात आले. विद्यार्थ्यांचा एकच...
पुणे(प्रतिनिधी)--पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीमधील महापौर कार्यालयाला बॉम्बने उडवून देण्याचा धमकीचा ई-मेल आल्याने बुधवारी शहरात एकच खळबळ उडाली. या गंभीर धमकीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महापालिकेची मुख्य इमारत तातडीने रिकामी करण्यात आली असून, पोलीस आणि बॉम्ब शोधक व नाशक पथकाकडून (BDDS) परिसरात कसून तपासणी सुरू करण्यात आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, महापौर मंजूषा नागपुरे यांच्या अधिकृत ई-मेल आयडीवर १० जून रोजी सकाळी...
क्राईम
तळेगाव एमआयडीसीतील शाफलर इंडिया कंपनीत गॅस गळती; दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू, तिघे गंभीर
News24Pune -
पिंपरी(प्रतिनिधी) - तळेगाव एमआयडीसीतील शाफलर इंडिया या कंपनीत अग्निशमन यंत्रणेच्या देखभाल कामादरम्यान कार्बन डायऑक्साइड गॅसची गळती होऊन झालेल्या दुर्घटनेत दोघांचा मृत्यू झाला. तर, तिघेजण जखमी झाले. ही घटना मंगळवारी (दि. ९) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.गौरीशंकर शर्मा (वय ३८, रा. आंबी, मावळ) आणि वैभव भाऊसाहेब थोरात (वय २४, रा. चिखली) अशी मृत्यू झालेल्या कर्मचार्यांची नावे आहेत. तर, प्रमोद जैस्वार, श्रीकृष्ण...
पुणे(प्रतिनिधी)--वडिलोपार्जित जमिनीच्या ७/१२ उताऱ्यावर वारस नोंद करण्यासाठी ७० हजार रुपयांची लाच घेणाऱ्या हवेली तालुक्यातील चऱ्होली बुद्रुक येथील तलाठ्यासह त्याच्या खाजगी एजंटला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सोमवारी रंगेहाथ अटक केली.सुनील भिकाजी सातोसे (वय ४४) असे अटक करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव असून, नेमाजी माधवराव भोकरे (वय ४०) या खाजगी मध्यस्थालाही या कारवाईत ताब्यात घेण्यात आले आहे. या घटनेमुळे पुणे महसूल विभागात...














