gtag('js', new Date());
पुणे- हवेली व मुळशी तालुक्याच्या सीमेवर असलेल्या जांबली व डावजे येथील श्री क्षेत्र निलकंठेश्वरच्या पायथ्याशी असलेल्या आदीवासी कातकरी व डोंगरी धनगर वस्तीवर नवज्योत परिवार ट्रस्ट व  लायन्स क्लब ऑफ पुणे विसडम यांच्या संयुक्त विद्यमाने  वंचित व आदिवासी बांधवाना जीवनावश्यक साहित्य,अन्न,फळे, खाऊ आणि कपड्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी ट्रस्टचे अध्यक्ष संजय लगाडे, सचिव...
पुणे--औरंगजेबांना मानणाऱ्या लोकांच्या मताच्या हव्यासापोटी अजित पवारांनी छत्रपती संभाजी माहाराज हे धर्मवीर नव्हते असे वक्तव्य केले. अजित पवारांना इतिहासात नाक खुपसण्याची काहीच गरज नाही, जे मुळातच हिंदू विरोधी आहेत. त्यामुळे त्यांनी देशातील नागरिकांची आणि हिंदू धर्मीयांची माफी मागावी, अशी मागणी पुण्यातील भाजप युवा मोर्चाच्यावतीनं करण्यात आंदोलनात भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.
नवी दिल्ली -सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने नोटाबंदीबाबत मोठा निकाल दिला. न्यायालयाने केंद्र सरकारचा निर्णय कायम ठेवत यासंबंधीच्या सर्व ५८ याचिका फेटाळून लावल्या. नोटाबंदीबाबत सरकारने सर्व नियमांचे पालन केले आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. या मुद्द्यावर सरकार आणि आरबीआयमध्ये सहा महिने चर्चा झाली आणि त्यानंतर निर्णय घेण्यात आला.सर्वोच्च न्यायालयाच्या या टिप्पणीनंतर सरकारने हा...
पुणे— अहमदाबादेतील यूएन मेहता रुग्णालयात प्रकृती खालावली म्हणून दाखल करण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातु:श्री हीराबेन मोदी यांच्या प्रकृतीची चौकशी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी मोदींना पत्र लिहून केली आहे. शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून आईच्या उत्तम प्रकृतीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मातु:श्री...
पुणे— पुणे विमानतळावर सिंगापूर येथून आलेला एक प्रवासी कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने खळबळ उडाली आहे.या प्रवाशाचे नमुने घेण्यात आले असून जनुकीय क्रमनिर्धारणासाठी (जिनोम सिक्वेन्सिंग) पाठवण्यात आले असल्याची माहिती पालिकेने दिली आहे. दरम्यान, गेल्या ८ ते १० दिवसांपासून आपण विदेशातून येणाऱ्या नागरिकांची चाचणी करण्यास सुरुवात केली आहे,” चिंता करण्याची गरज नाही, अशी माहिती पुणे महापालिकेतील सहाय्यक आरोग्य अधिकारी...
Koregaon Bhima Shaurya Diwas
पुणे-कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ अभिवादन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पुणे-अहमदनगर महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. पुणे-अहमदनगर महामार्ग क्रमांक ६०  वरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ३१ डिसेंबर २०२२  रोजी सायंकाळी ५ वाजल्यापासून ते १ जानेवारी २०२३ रोजी रात्री १२  वाजेपर्यंत बंद करुन पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी निर्गमित केले आहेत.