अजित पवार यांनी देशातील नागरिकांची आणि हिंदू धर्मीयांची माफी मागावी

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

पुणे–औरंगजेबांना मानणाऱ्या लोकांच्या मताच्या हव्यासापोटी अजित पवारांनी छत्रपती संभाजी माहाराज हे धर्मवीर नव्हते असे वक्तव्य केले. अजित पवारांना इतिहासात नाक खुपसण्याची काहीच गरज नाही, जे मुळातच हिंदू विरोधी आहेत. त्यामुळे त्यांनी देशातील नागरिकांची आणि हिंदू धर्मीयांची माफी मागावी, अशी मागणी पुण्यातील भाजप युवा मोर्चाच्यावतीनं करण्यात आंदोलनात भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी केली.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राज्याच्या हिवाळी अधिवेशनात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. पवार यांच्याविरोधात पुण्यातील जंगली महाराजांच्या पुतळ्यासमोर भाजप युवा मोर्चाच्यावतीनं आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला.

मुळीक म्हणाले, राज्याचे विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केला आहे. संभाजी राजेंची कारकीर्द जर आपण बघितली तर औरंगजेबाच्या विरोधात लढण्यात त्यांचा मोठा कार्यकाळ गेला. या देशाच आणि धर्माचं रक्षण करण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. हा इतिहास संपूर्ण देशाला माहिती आहे.

औरंगजेबाने छत्रपती संभाजी राजेंचा खूप मोठा छळ केला आणि हिंदू धर्मीयांची हजारो मंदिरे पाडली. लाखो लोकांना मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला, असे असताना देखील लाचार होऊन मतासाठी अजित पवारांनी जे कृत्य केलं आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही येथे जमलो आहे, असे मुळीक म्हणाले.

ते पुढे म्हणाले, संभाजी महाराजांकडून प्रेरणा घेऊन आजही देशात कोट्यवधी लोक जगतात. धर्मासाठी जगण्याची आणि आहुती देण्याची प्रेरणा आजही त्यांच्याकडून घेतली जाते. पण दुर्दैवाने अजित पवार आणि त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस औरंगजेबाकडून प्रेरणा घेतेय असं दिसतय, अशा शब्दात त्यांनी अजित पवारांवर टीका केली.

ब्राह्मण महसंघाकडून संभाजी महाराजांच्या पुतळ्यावर दुग्धाभिषेक

हिंदवी स्वराज्याचे दुसरे सेनापती शिव प्रभुचे वारस छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीरच होते.स्वराज्य आणि स्वधर्म यासाठी बलिदान केलेला हा हिंदू छावा असून त्यांच धर्मवीर पद नाकारण हा त्यांचाच नव्हे तर समस्त हिंदूंचा शिव प्रभुचा अपमान आहे.अस म्हणत हिंदू महासभेच्या वतीने डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिषेक आणि पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी हिंदू महासभेचे आनंद दवे म्हणाले की, २०१८ रोजी संभाजी राजे यांचा उल्लेख अजित पवार यांनी ट्विटमध्ये धर्मवीर असा उल्लेख केला होता. पण आता अजित पवार किंवा जितेंद्र आव्हाड यांना संभाजीराजे हे धर्मवीर वाटत नाही. त्यांनी स्वतःची अक्कल पाजळण्याची गरज नाही. राष्ट्रवादीमधील काही नेत्यांकडून पद्धतशीरपणे आदर्श पुरुषांची बदनामी करण्याची मोहीम हाती घेतल्याच दिसत आहे.त्या कृतीचा हिंदू महासंघ निषेध करित असल्याचं त्यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले की, अजित पवार यांनी एवढं मोठ विधान करून देखील खासदार उदयनराजे किंवा संभाजी राजे का भूमिका मांडत नाही.त्या दोघांना अजित पवार यांच वक्तव्य मान्य आहे का ? ते धर्म प्रेमी किंवा धर्मवीर नव्हते ? त्यावर दोघांनी भूमिका मांडावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

100% LikesVS
0% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *