gtag('js', new Date());
सासवड-जेजुरी वारी अपघात (Saswad-Jejuri Wari Accident)
पुणे(प्रतिनिधी)- संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सासवड येथील मुक्काम आटोपून जेजुरीच्या दिशेने मार्गस्थ होत असताना एका भरधाव ट्रकने सांगली जिल्ह्यातील कसबे डिग्रज येथील दिंडीत पायी चालणाऱ्या वारकरी महिलांना जोरात धडक दिल्याने झालेल्या अपघातात सांगलीतील तीन महिला वारकऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले. सासवड-जेजुरी रस्त्यावरील बेलसर टोलनाक्मयापासून जेजुरीच्या बाजूला सुमारे ५०० मीटर अंतरावर असलेल्या ‘हॉटेल शिपदीप लॉजिंग’समोर...
मोशी कचरा डेपो इमारत दुर्घटना
पुणे(प्रतिनिधी)- पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपो येथे इमारत कोसळून झालेल्या भीषण दुर्घटनेला चार दिवस उलटूनही शनिवारी  संध्याकाळपर्यंत बचावकार्य युद्धपातळीवर सुरूच होते. या ढिगाऱ्याखाली एकूण २३ जण अडकले होते, त्यापैकी १४ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले आहे, तर ८ जणांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्यापैकी एक मृतदेह गुरुवारी शनिवारी दिवसभरात सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात...
निवडणूक प्रक्रियेतील घोडेबाजार थांबवण्यासाठी सुप्रिया सुळे संसदेत मांडणार खाजगी विधेयक
नाशिक(प्रतिनिधी) - राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) खासदार अस्वस्थ असून ते पक्ष बदलण्याच्या तयारी असल्याचा दावा राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला होता. मात्र, खासदार सुप्रिया सुळे यांनी हा दावा पूर्णपणे फेटाळून लावत पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर पलटवार केला आहे. आमच्या पक्षातील ८ खासदारांपैकी कोणीही पृथ्वीराज बाबांची भेट घेतलेली नाही, असे स्पष्ट करतानाच सुळे यांनी लोकप्रतिनिधींना 'वस्तू' (कमोडिटी) समजणाऱ्या...
मोशी कचरा डेपो इमारत दुर्घटना
पिंपरी-चिंचवडमधील मोशी येथे कचरा डेपोच्या परिसरातील इमारत कोसळल्याच्या घटनेला आता ७० तासांपेक्षा अधिक काळ उलटून गेला असून, बचावकार्य अजूनही अत्यंत वेगाने सुरू आहे. या दुर्घटनेतील सर्वात मोठी आणि दिलासादायक अपडेट म्हणजे, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या ८ व्यक्तींपैकी तिघेजण बचाव पथकाला  दिसून आले आहेत. एनडीआरएफ आणि महापालिकेच्या यंत्रणांकडून या तिघांना बाहेर काढण्याचे काम आता युद्धपातळीवर सुरू असून, आज रात्रीपर्यंत हे संपूर्ण रेस्क्यू...
मुंबई(प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वर्तुळात ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विधानभवनातील भेटीवरून विविध चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर खासदार सुप्रिया सुळे यांनी अतिशय सविस्तरपणे या भेटीमागचे वास्तव स्पष्ट केले आहे. शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या कामासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधण्यासाठी विधानभवनात गेले होते. आपले काम आटोपून परतत असताना, आमदारांशी बोलण्यासाठी त्यांनी...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अलीकडील ऑस्ट्रेलिया दौरा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील द्विपक्षीय संबंधांना एका नवीन उंचीवर घेऊन जाणारा ठरला आहे. अणुऊर्जा क्षेत्रातील ऐतिहासिक करारापासून ते संरक्षण आणि अंतराळ सहकार्यापर्यंत, या दौऱ्याने भारताच्या भविष्यातील ऊर्जा सुरक्षा आणि जागतिक धोरणात्मक भूमिकेसाठी एक नवीन मार्ग प्रशस्त केला आहे. या भेटीचे महत्त्वाचे पैलू आणि त्याचे भारताच्या प्रगतीवर होणारे परिणाम याचा हा विशेष आढावा....पंतप्रधान...