राज्यात 283 पोलिस कर्मचारी-अधिकारी कोरोना योद्धा बांधवांचा मृत्यू


मुंबई- कोरोनाचे संकट महाराष्ट्रात सुरु झाले तेव्हापासून कोरोनायोद्धा म्हणून महाराष्ट्र पोलीस रात्रंदिवस लोकांना सजग करण्यासाठी झटत होते. स्वत:चा जीव धोक्यात घालून लोकांमध्ये जनजागृती करणाऱ्या राज्यातील 26,395 पोलीस व अधिकारी कोरोना ग्रस्त झाले होते त्यापैकी 24,595 कोरोना मुक्त झाले आहेत. मात्र, दुर्देवाने 255 पोलीस व 28 अधिकारी अशा एकूण 283 पोलिस कर्मचारी-अधिकारी बांधवांचा मृत्यू झाला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.

कोरोनाचे संकट महाराष्ट्रावर घोंगावत असताना विविध मार्गाने जनजागृती करणाऱ्या पोलिसांचे अनेक व्हिडीओ लॉडाऊनच्या सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले आहे. घराच्या बाहेर पडू नका, आपल्या मागे आपले कुटुंब आहे त्यांची काळजी घ्या असे पोट तिडकीने सांगणारे पोलीस मात्र, स्वत:च्या जीवाची पर्वा न करता कोरोना योद्धा म्हणून रात्रंदिवस काम करत राहिले त्यातच अनेकांना कोरोनाची बाधा होऊन आपले प्राण गमवावे लागले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  सागरी अर्थव्यवस्थेच्या वृद्धीसाठी भारतीय बंदरांचे डिजीटायझेशन आणि हरित विकास आवश्यक - अनुप मुदगल