लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात 35 कोटी 18 लाखांची दंड आकारणी


मुंबई- लॉकडाऊन सुरू झाल्यापासून राज्यात दिनांक २९ ऑक्टोबर पर्यंत कोविड संदर्भात कलम 188 नुसार  2 लाख 89 हजार गुन्हे, तसेच 1347 वाहनांवर अवैध वाहतूकीचे गुन्हे दाखल झाले तर 35 कोटी 18 लाख रुपयांची दंड आकारणी करण्यात आली आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली आहे.

राज्यात  दि.22 मार्च ते 28 आँक्टोंबर पर्यंत कलम 188 नुसार 2,89,247 गुन्हे नोंद झाले असून 42,069 व्यक्तींना अटक करण्यात आली आहे तर 96 हजार वाहने जप्त करण्यात आली आहे. यातील विविध गुन्ह्यांसाठी 35 कोटी 18 लाख 57 हजार 908 रु. दंड  वसूल करण्यात आला आहे.

कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी पोलीस दल, आरोग्य विभाग, डॉक्टर्स, नर्सेस अहोरात्र मेहनत घेत आहेत. परंतु काही दुष्ट प्रवृत्ती त्यांच्यावर हल्ला करीत आहेत. अशा हल्लेखोरांविरुद्ध  कडक कारवाई करण्याचे आदेश पोलीस विभागाला देण्यात आले असल्याचे देशमुख यांनी सांगितले.

अधिक वाचा  ब्लेंडर्स प्राईड फॅशन नाईट्स पुण्यात दाखल

या दरम्यान पोलिसांवर  हल्ला होण्याच्या 381 घटना घडल्या. त्यात 904 व्यक्तींना, ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.

100 नंबर- 1 लाख 14 हजार फोन

 पोलीस विभागाचा 100 नंबर हा सर्व जिल्ह्यात 24 तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या फोनवर  1,14,356 फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली.या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1347 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले. तर 96,696 वाहने जप्त करण्यात आली आहेत.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love