कुख्यात गुंड गजा मारणे मिरवणूक प्रकरण:अजित पवारांची पोलिसांना तंबी

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- कुख्यात गुंड गजा मारणे यांची तळोजा कारागृहातून एका प्रकरणात निर्दोष सुटका झाल्यानंतर त्याच्या समर्थकांनी कारागृहाच्या बाहेर गर्दी करून तळोजा कारागृहापासून पुण्यापर्यंत मिरवणूक काढली. 300- ते 350 गाड्यांचा ताफ्यासह ही मिरवणूक काढली गेली. मात्र, त्याची ही मिरवणूक निघाली असताना त्याला ना तळोजा पोलिसांनी हटकलं ना महामार्ग पोलिसांनी. पिंपरी-चिंचवडमध्ये आल्यावर मात्र, त्यांच्यावर आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर एका गुंडांची अशा प्रकारची मिरवणूक निघतेच कशी अशी टीका सुरू झाली. कायदा-सुव्यवस्था राज्यात आहे की नाही असे प्रश्न विचारले जाऊ लागले. त्यानंतर पोलिस खडबडून जागे झाले आणि  या मिरवणुकीवरून गजा मारणे आणि त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल झाला. त्यातही त्यांची जामिनावर सुटका झाली.

दरम्यान, याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज पुणे पोलिसांना सुनावले आहे. एका गुन्ह्यात निर्दोष सुटलेल्या गुंडांची तळोजा ते पुणे अशी जंगी मिरवणूक निघाली ही शहराच्या सामाजिक स्वास्थ्याच्या दृष्टीने चांगलं नाही. तरुण पिढीपुढे आपण चुकीचा आदर्श ठेवत असून, ते घातक आहे. पुन्हा अशा घटना घडता कामा नये. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे. पोलिसांचा वचक सामान्यांवर नाही तर तो गुंडांवर असला पाहिजे असे सांगत अशा लोकांना पोलिसांनी पाठीशी घालता कामा नये अशी तंबी दिली.

 शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील रिक्रिएशन सभागृहात अनुकंपा भरती पोलीस पाल्याना प्रातिनिधिक स्वरुपात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नियुक्तीपत्र तसेच नागरिकांना मुद्देमाल प्रदान करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, अपर पोलीस आयुक्त जालिंदर सुपेकर आदी उपस्थित होते.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *