ओयो हॉटेल्स अँड होम्स च्या सॅनिटाइज्ड बिफोर युअरआईज साठी बॉलिवुड अभिनेता सोनू सूद ब्रँड अँबॅसेडर

पुणे-मुंबई
Spread the love

पुणे- भारताची अर्थव्यवस्था आता वेग घेत आहे आणि एका नव्या अर्थाने व्यवसायाची क्षेत्रे खुली होत आहेत. पर्यटन क्षेत्रातील नवे प्रवाह आणि ग्राहकांच्या बदलत्या अपेक्षा यांचा मागोवा घेऊन ओयो हॉटेल्स अँड होम्सने युनिलिव्हरच्या सहकार्याने ‘सॅनिटाइज्ड स्टे’ हा स्वच्छता आणि आरोग्य राखण्यासाठीचा उपक्रम आयोजित केला. त्यानंतर कंपनीने हाती घेतलेल्या स्वच्छता पद्धतीचे प्रात्यक्षिक ग्राहकांना दिसावे म्हणून, महाराष्ट्रात लोकप्रिय असलेल्या आणि ओयो हॉटेलचा सदस्य हॉटेल मालक असलेल्या सोनू सूद या बॉलिवुड अभिनेत्याचा सहभाग असलेली स्वच्छता प्रत्यक्ष पाहून खात्री करा ही जाहिरात मोहीम ही हाती घेतली. ग्राहकाला मध्यवर्ती स्थानी ठेवून बेतलेली या मोहिमेतली ‘पहले स्प्रे, फिर स्टे’ ही पहिली जाहिरात आता टेलिव्हिजन आणि डिजिटल मीडिया मध्ये प्रसारित झाली आहे.

ओयो हॉटेल्स अँड होम्स च्या ग्लोबल ब्रॅण्डिंग चे प्रमुख श्री मयूर होला म्हणाले, विश्वास आणि प्रेम या जोडीसारखे असतात.भारत पूर्वपदावर येत असताना आमच्या अतिथींना आम्ही सॅनिटाइज्ड स्टेज हा आरोग्यकारी अनुभव मिळवून देत आहोत. त्यामुळे ते स्वतः सुटीचा आनंद उपभोगू शकतील आणि आम्ही त्यांची योग्य काळजी घेऊ.

ओयो हॉटेल्स अँड होम्स च्या सॅनिटाइज्ड बिफोर युअर आईज बरोबर ब्रँड अँबॅसेडर म्हणून काम करण्याच्या अनुभवाबद्दल बॉलिवूड अभिनेता सोनू सूद म्हणाला, एक हॉटेल मालक म्हणून ओयो बरोबर काम करताना मला ओयोच्या टीमने गेल्या काही महिन्यात सुरक्षित आरोग्यदायी वातावरण राखण्यासाठी आणि एखाद्या अतिथींच्या सुरक्षिततेसाठी नियोजनापासून पूर्ण प्रक्रियेत स्वयंस्फूर्तीने जे प्रयत्न केले ते मी स्वतः अनुभवले आहेत. सर्वच प्रकारच्या प्रवाशांना भारतभर कुठेही मोकळेपणे प्रवास करता यावा आणि राहण्याची स्वस्त आणि दर्जेदार सोय मिळावी यासाठी ओयो प्रयत्नशील असते असे मी मानतो. म्हणूनच या मोहिमेत सहभागी होण्याची संधी माझ्यापुढे अली तेव्हा मी लगेच होकार दिला. आज माझ्यासकट सर्वच प्रवासी विषाणू प्रादुर्भावाच्या या दिवसात आरोग्य आणि स्वच्छता याबाबतीत काळजी घेतात. सॅनिटायझेशन होत असलेले स्वतः पाहिल्यावर अतिथीची काळजी ब-याच अंशी दूर होईल आणि हॉटेल मधील वास्तव्याचा आनंद त्याला मिळेल. या प्रयत्नांचा एक भाग होण्याची संधी मला मिळाली याचा मला आनंद आहे आणि यामुळे ओयो हॉटेल्स अँड होम्सच्या सेवांचे ग्राहक सुरक्षित आणि आरोग्यकारी अनुभव घेऊ शकतील याची मला आशा आहे.

आराम करण्यासाठी प्रवासाला जाण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाण वाढत असताना ८० टक्के पर्यटक स्वच्छ आरोग्यदायी निवास सोयीचा शोध घेतात तर ४६ टक्के प्रवासी जाण्याच्या ठिकाणी काय नियम पाळायचे आहेत याची माहिती घेण्याला प्राधान्य देतात असे ओयोच्या एका ग्राहक पाहणीत दिसून आले आहे. यासाठीच ओयो ने एक ऍप वर वापरण्याची सोय उपलब्ध करून भारतात प्रवास करताना लागणारी सर्व माहिती – कोविड तपासणी केंद्रे, राज्यांचे नियम देऊ केली आहे. यात ओयो आणि डॉ. लाल पॅथ लॅब, एसआरएल डायग्नॉस्टिक्स, वनएमजी आणि इंडस प्लस यांच्या सहकार्याने उपलब्ध सुविधांची माहितीही समाविष्ट आहे.  

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *