‘आकडो से पेट नही भरता, जब भूक लगती है तो धान और रोटी लगती है’ : सुप्रिया सुळेंनी पंतप्रधान मोदींना करून दिली स्व. सुषमा स्वराज यांच्या वाक्याची आठवण


पुणे- -आज देशात एक नव्हे, दोन नव्हे तर चार पटीने महागाईमध्ये वाढ करण्यात आली आहे. आज मला कै. सुषमा स्वराज यांची आठवण होत आहे. तेव्हाही त्यांचे भाषण भावलं होत आणि आजही ते भाषण भावत आहे. त्यांनी आमच्या सरकारला विचारलं होत की, ‘आकडो से पेट नही भरता, जब भूक लगती है तब धान और रोटी लगती है ’. मला देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हीच आठवण करून द्यायची आहे की, ‘आकडो से पेट नही भरता ,जब भूक लगती है तब धान और रोटी लगती है’, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी समाचार घेतला.

महागाईवर विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. यावर सुळे यांना विचारले असता ते म्हणाले की, फडणवीस यांना या विषयाचा प्रगल्भ अनुभव आहे. त्यांना याचा विसर पडला असेल की देशात भाजपाची सरकार आहे. जेव्हा आमचं सरकार होत आणि ते विरोधात होते तेव्हाचे त्यांचे भाषण पाहावी. त्यांना महागाई कशामुळे होते हे चांगलेच माहिती आहे, असा टोला देखील यावेळी सुळे यांनी फडणवीस यांना लगावला.

अधिक वाचा  #Medha Kulkarni: मेधा कुलकर्णी यांचा राजकीय वनवास संपला: भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी

माझी देवचरणी एवढीच मागणी आहे की केंद्र सरकारला सुबुद्ध दे आणि त्यांनी जे झोपायचं सोंग घेतलं आहे. नको त्या विषयाला महत्व देत आहे. हे दुर्दैवी आहे. माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विनंती आहे की त्यांनी देशाच्या हितासाठी सगळं काही बाजूला ठेवून त्यांनी देशाची अर्थव्यवस्था कशी टिकवता येईल यासाठी प्रयत्न करावे. सर्व राज्याच्या मुख्यमंत्री यांची बैठक घेऊन यावर तोडगा काढावा,असे देखील यावेळी सुळे म्हणाल्या.

सर्वच भारतीयांनी भारत दर्शन करावं

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अयोध्येच्या दौऱ्यावर जात आहे. त्यांच्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातूनच विरोध होत आहे. त्यामुळे राज ठाकरे या अयोध्या दौरा वादात सापडला आहे. राज ठाकरे यांच्या अयोध्येच्या दौऱ्याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना सुळे म्हणाल्या, भारत हा सुंदर देश आहे. सर्वच भारतीयांना एक विनंती आहे की, काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्वच भारतीयांनी भारत दर्शन करावं. पंडित जवाहरलाल नेहरूंनी ‘भारत एक खोज’ नावाचं एक अप्रतिम पुस्तक लिहिलं आहे. मी वाचलं आहे. मीही देश फिरलेली आहे. तसंच जर सर्व करत असतील तर देशासाठी चांगलंच आहे, असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love