पुणे- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली पुण्यातील विद्यापीठ आणि महाविद्यालये सोमवार पासून सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली. तसेच सोमवारपासून पुण्यातील हॉटेल्स रात्री 11 वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड जिल्ह्यातील पर्यटनस्थळं सुरु करण्याचा निर्णयही शुक्रवारी कोरोना आढावा बैठकीत घेण्यात आल्याची माहिती अजित पवार यांनी दिली.
सोमवारपासून खासगी कार्यालयात 100 टक्के उपस्थितीला परवानगी देत आहोत. सोमवारपासून महाविद्यालये सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पण विद्यार्थ्यांना दोन्ही डोस बंधनकारक असून शहराबाहेरील विद्यार्थ्यांना rtpcr बंधनकारक असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. 22 ऑक्टोबरपर्यंत नाट्यगृह सुरु करणार आहोत. तसंच सोमवारपासून राज्य आणि केंद्र सरकारशी संबंधित ट्रेनिंग सेंटर सुरु करणार आहे, असं अजित पवार म्हणाले.
चित्रपटगृह आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून ५० टक्के क्षमतेनं सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. दसरा झाला की मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक होईल. आणि सिनेमा – नाट्यगृह सुरु करण्याचे नियोजन केले जाई असही ते म्हणाले आहेत.