लायन्स क्लब ऑफ पुणे विसडमच्या वतीने महिलांना ‘सॅनिटरी पॅड’चे मोफत वाटप


 पुणे–आजच्या धावपळ व धकाधकीच्या जीवनात स्त्रीयांनी आपल्या आरोग्याची काळजी घेऊन आपण अबला नसून सबला असल्याचे दाखवून देणे ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन लायन महेश गायकवाड यांनी केले.       

लायन्स क्लब ऑफ पुणे विसडमच्या वतीने लायन्स ऑक्टोबर विशेष सेवा सप्ताहाचे औचित्य साधून ‘महिला सबलीकरण व सक्षमीकरण’ अंतर्गत किरकटवाडी येथील ज्ञानज्योती विद्या मंदिर या शाळेत शालेय विध्यार्थीनी व शिक्षिका आणि महिला कर्मचारी यांना ‘सॅनिटरी पॅड’ चे वाटप करण्यात आले .

क्लबचे अध्यक्ष लायन महेश गायकवाड यांनी मार्गदर्शनपर विचार व्यक्त करताना सांगितले की,आपल्या संस्कृतीमध्ये महिलांचे स्थान अतिशय पवित्र व महत्वाचे आहे. महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले गेले पाहिजे.आरोग्य व्यवस्थित असेल तर मानसिक स्वास्थ्य देखील चांगले लाभते आणि आनंदी जीवन जगता येते.त्याकरिता मासिक पाळी दरम्यान खास काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे भविष्यात दुर्धर आजार किंवा व्याधी यांना सामोरे जावे लागणार नाही.

अधिक वाचा  खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात

विशेषतः मुलींनी मासिक पाळी काळात कुठल्याही प्रकारे त्रास होत असेल तर मनात संकोच न ठेवता किंवा न लाजता ते आपापल्या आई किंवा बहीण यांच्याशी चर्चा केली पाहिजे असा सल्ला देखील लायन महेश गायकवाड यांनी दिला.  यावेळी दोनशे सॅनिटरी पॅड चे वितरण करण्यात आले.यावेळी कुमारी मृणाल महेश गायकवाड हिच्या हस्ते पॅडचे वाटप करण्यात आले . शाळेच्या मुख्याध्यापिका सौ मनीषा कारले यांनी स्वागत केले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love