पाहुणे गेल्यानंतर काय बोलायचे ते बोलेन: अजित पवार यांची मिश्किल प्रतिक्रिया


पुणे— “पाहुणे लोक थांबलेले आहेत. त्यांना आपल्याला डिस्टर्ब करायचं नाही. ते चौकशी करून गेल्यानंतर मला काय बोलायचे ते बोलेन . मी इथेच आहे. मी आर्थिक शिस्त पाळणारा आहे. मी कुठेही जाणार नाही,” अशी मिश्किल प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.  

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्याशी संबंधित तसेच त्यांच्या नातेवाईकांच्या कपन्यांवर आयकर विभागाकडून कारवाई केली जात आहे. आयटी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ही चौकशी सुरुच आहे. या सर्व प्रकरणावर बोलताना अजित पवार यांनी स्पष्टपणे प्रतिक्रिया देणे टाळले. मात्र, आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना ते मिश्किलपणे पाहुणे असे म्हणाले. तसेच ही चौकशी संपली की पूर्ण पुराव्यानिशी बोलतो, असे देखील ते म्हणाले. अजित पवार आज कोरोनाविषयक आढावा बैठकीसाठी पुणे दौऱ्यावर होते. बैठक संपल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.

अधिक वाचा  ‘सारथी’ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा देण्यात यावा- राधाकृष्ण विखे पाटील

ते म्हणाले, आयकर विभागाचे पाहुणे आलेत ते चौकशी करून गेल्यानंतर मला काय बोलायचे ते बोलेन मी पळून चाललेलो नाही. त्यांच्या चौकशीत अडथळा निर्माण होईल, असे मी काही करणार नाही. मी कधीही नियमबाह्य वागत नाही. प्रत्येकाने सरकारचे कर वेळेत भरावेत असा माझा नेहमी आग्रह असतो. माझ्याशी संबंधित सर्व सहकारी तसेच खासगी संस्थांना अर्थिक शिस्त लावण्याचा माझा प्रयत्न असतो. त्यामुळे उपस्थित करण्यात येत असलेल्या सर्व प्रश्‍नांची उत्तरे मी देणार आहे. जरंडेश्‍वरचा मालक कोण याचेही उत्तर मी देणार आहे.’’

 “आता सध्या चौकशी सुरु आहे. आयकर विभाग त्यांचं काम करणार आहे. सध्या काम सुरु आहे. आजसुद्धा हे काम सुरु आहे. आयकर विभागाला कोणत्याही कंपनीवर रेड टाकण्याचा अधिकार आहे. यामध्ये काय योग्य आहे ? काय अयोग्य आहे ? कॅश सापडतात का ? याची ते चौकशी करतात. त्यांची चौकशी करुन ते जातील. मग मी यावर भाष्य करेल,” असे अजित पवार म्हणाले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love