…ही देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक : मुरलीधर मोहोळ

Citizens benefit from Mohol's effective system
Citizens benefit from Mohol's effective system

पुणे- पुणे लोकसभा मतदार संघात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढत होणार आहे. रवींद्र धंगेकर कसबा विधानसभेची निवडणूक जिंकून आमदार झाले. आता ते लोकसभेसाठी उभे आहेत. त्यामुळे ‘धंगेकर पॅटर्न’ लोकसभेसाठी चालणार का? याच्या चर्चा सुरू आहेत. याला मुरलीधर मोहोळ यांनी कसबा पोटनिवडणूक आणि पुणे लोकसभा निवडणूक या दोन्ही निवडणुकांचा संदर्भ लावणे कसा चुकीचा आहे हे स्पष्ट करत, ही देशाचं भविष्य ठरवणारी निवडणूक आहे हे अगदी सर्वसामान्य माणसाला कळतं”, असे म्हटले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये लोकसभा निवडणुकीचे महत्व, देशाचे नेतृत्व कसे असावे, महायुतीचा उमेदवार निवडून येणे हे का आवश्यक आहे, त्यांचा दृष्टिकोनातून पुण्याच्या विकासाचे पुढील 50-100 वर्षांचे विकासाचे व्हीजन, केंद्र सरकारच्या माध्यमातून पुणे शहरासाठी झालेली कामे, इत्यादी गोष्टींबाबत भूमिका स्पष्ट केली.

अधिक वाचा  'दगडूशेठ' गणपतीला ३०१ किलो मोतीचूर मोदक आणि १३१ लीटर शहाळ्याचे आईस्क्रीम अर्पण  

प्रतिस्पर्धी उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या उमेदवारीने धाकधूक वाढली आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना मोहोळ म्हणतात की, अगदी सर्व सामान्य माणसाला, ज्याला या विषयात थोडं कळतं तो सुद्धा सांगेल की एका विधानसभेची पोटनिवडणूक आणि लोकसभेची निवडणूक याचा एकमेकांशी संदर्भ लावण्याचा प्रश्नच येत नाही. कारण ही निवडणूक देशाचे नेतृत्व कोणी केले पाहिजे?, देश कोणी चालवला पाहिजे?, कुठल्या नेतृत्वाच्या हातामध्ये देश सुरक्षित राहील?, कोणाच्या नेतृत्वाखाली देशाचा विकास होईल आणि देश पुढे जाईल? भारताला महासत्ताक देश म्हणून बनविण्याची क्षमता कोणामध्ये आहे? या सर्व गोष्टींचा विचार करूनच लोक मतदान करतात आणि करतील. त्यामुळे कसबा पोटनिवडणुकीसारख्या छोट्या निवडणुकीचे संदर्भ कुठे लागू होत नसतात.  लोकसभेची निवडणूक मोठी आहे आणि देशाचे भविष्य ठरवणारी निवडणूक आहे त्यामुळे  मला या गोष्टीचं काही वाटत नाही.

अधिक वाचा  तब्बल २४ वर्षांनी एकत्र येत कण्वमुनी विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी जागवल्या जुन्या आठवणी

मोदीजींना एक मत देण्याची संधी मला पुणेकर देतील याचा मला विश्वास

आपल्या राजकीय प्रवासाबाबत बोलताना मोहोळ म्हणतात, माझ्यासारखा एक वॉर्ड स्तरावरचा कार्यकर्त्याला पक्षाने लोकसभेचा उमेदवार म्हणून संधी मिळणं हे फक्त भारतीय जनता पक्षामध्येच हे घडू शकतं.म्हणून मला माझ्या पक्षाचा नक्कीच अभिमान आहे. जिथे कार्यकर्त्याला न्याय दिला जातो, कार्यकर्त्याला संधी दिली जाते हे तुम्हाला आमचे सर्व नेते बघितले तर लक्षात येईल. अगदी देवेंद्रजींपासून मोदीजींपर्यंत.  माझ्यासारखा कुठलीही पार्श्वभूमी नसणारा आणि अत्यंत सर्वसामान्य कुटुंबातून आलेला वॉर्ड स्तरावरचा कार्यकर्ता म्हणून लोकसभेच्या मोठ्या निवडणुकीला उमेदवार म्हणून उभे राहताना नक्कीच समाधान आहे.  लोकांच्या अपेक्षा आहेत, पुणेकरांच्या अपेक्षा आहेत.  मला असं वाटतं की इथून मागे जे काही मी 25-30 वर्ष राजकीय सामाजिक जीवनात या शहरात काम केले मग ते संघटनात्मक असो किंवा लोकप्रतिनिधी म्हणून मला विश्वास वाटतो की पुणेकर निश्चितपणे मला संसदेमध्ये पुण्याचा प्रतिनिधित्व करण्याची आणि मोदीजींना एक मत देण्याची संधी नक्की देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love