“बहुत छाले है उसके पाओं में, कम्बख़्त उसूलों पे चला होगा!”- का केलं अमृता फडणवीस यांनी असं ट्वीट?

राजकारण
Spread the love

मुंबई- रिपब्लिक टिव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांच्या अटकेनंतर राजकीय गदारोळ सुरू झाला असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी एकमेकांवर झाडल्या जात आहेत. मुंबई पोलिस कधीही सुडाने कारवाई करत नाही अशी पाठराखण खासदार संजय राऊत यांनी केली असताना भाजपकडून अर्णव गोस्वामी यांची पाठराखण केली जात आहे. भाजपच्या इतर नेत्यांबरोबरच,देशातील आणीबाणी 1977 मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम असल्याची टीका विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तर, या वादात त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही उडी घेतली आहे. “बहुत छाले है उसके पाओं में, कम्बख़्त उसूलों पे चला होगा!” असे ट्वीट करत अमृता  फडणवीस यांनी अर्णव यांची पाठराखण केली आहे.

 ‘अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांनी अटक केली आणि त्याचे पडसाद राजकीय क्षेत्रात उमटले आहेत. दरम्यान, पोलिसांनी आपल्याला ताब्यात घेताना धक्काबुक्की केली असं अर्णब गोस्वामींने एएनआय वृत्तसंस्थेला सांगितलं आहे. रिपब्लिक टिव्हीने अर्णव यांना अटक केल्याचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. हा व्हिडिओ अमृता फडणवीस यांनी रीट्वीट करून  “बहुत छाले है उसके पाओं में, कम्बख़्त उसूलों पे चला होगा!” असे म्हटले आहे.

दरम्यान, आणीबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक आहे, अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे, असे ट्विट देवेंद्र फणवीस यांनी केले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *