2024 च्या निवडणुकीत पळ काढू नका- शिवसेनेच्या या आमदाराने दिले राणेंना आव्हान


सिंधुदुर्ग- शिवसेनेला कोकणातून हद्दपार करण्याचा विडा उचललेल्या खासदार नारायण राणे यांना शिवसेनेच्या आमदाराने आव्हान देत 2019 च्या निवडणुकीतून जसा पळ काढला तसा 2024 च्या निवडणुकीत काढू नका, शिवसेना काय आहे ही तुम्हाला कळेलच असा टोला लगावला आहे. सिंधुदुर्ग कुडाळचे आमदार वैभव नाईक यांनी ही आव्हान दिले आहे.

नारायण राणे यांनी कोकणात शिवसेनेचे 11 आमदारही निवडून येणार नाही असे सांगत शिवसेनेला कोकणातून हद्दपार करणार असल्याचं वक्तव्य केलं होतं त्याला आव्हान देत नाईक यांनी राणेंचा पराभव माझ्यासारख्या सर्वसामान्य सैनिकाने केला होता एवढंच नव्हे तर त्यांच्या मुलाचाही पराभव कोकणच्या जनतेने केला आहे असा टोला लगावला आहे. राणे ज्या-ज्या वेळी आव्हान देतात त्या-त्यावेळी ते पळ काढतात अशी टीकाही त्यांनी केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love
अधिक वाचा  राज्यामध्ये नामांतराशिवाय इतरही प्रश्न आहेत- अजित पवार