नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान ज्येष्ठ साहित्यिक,समीक्षक प्रा.विश्वास वसेकर यांना जाहीर

पुणे-मुंबई
Spread the love

पुणेः- येथील पद्मश्री नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीतर्फे देण्यात येणारा नारायण सुर्वे जीवनगौरव सन्मान यंदा ज्येष्ठ साहित्यिक, समीक्षक आणि सासवड येथे झालेल्या 22 व्या आचार्य अत्रे मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष प्रा.विश्वास वसेकर यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती स्वागताध्यक्ष आणि नारायण सुर्वे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष सुदाम भोरे, निवड समिती सदस्य कवी उद्धव कानडे आणि संयोजक पुरूषोत्तम सदाफुले यांनी कळविली आहे.

रविवार दिनांक 8 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी नारायण सुर्वे श्रमउद्योग पुरस्कार उद्योजक रंगनाथ गोडगे पाटील यांना, नारायण सुर्वे श्रमप्रतिष्ठा पुरस्कार कष्टकरी नेते काशिनाथ नखाते यांना, कुसुमाग्रज काव्यप्रतिभा पुरस्कार कविवर्य देविदास फुलारी यांना, नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार कवी सायमन मार्टिन, डॉ.विशाल इंगोले आणि कवी संदिप जगदाळे यांना प्रदान करण्यात येणार आहे.

पद्मश्री नारायण सुर्वे यांनी वास्तव्य केलेल्या आणि स्मारकात रुपांतरीत करण्यात आलेल्या नेरळ येथील वास्तूमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी भूषविणार असून यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून आंतरराष्ट्रीय उद्योग सल्लागार सचिन ईटकर, पद्मश्री नारायण सुर्वे यांच्या पत्नी कृष्णाबाई सुर्वे, महाराष्ट्र साहित्य परिषद भोसरीचे अध्यक्ष मुरलीधर साठे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, भोसरीचे अध्यक्ष मुकुंद आवटे, लायन्स क्लबचे अरूण इंगळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यानिमित्त काव्यजागर संमेलन होणार आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *