राज ठाकरेंच्या वक्तव्याला पूर्णपणे पाठिंबा पण, त्याआधी अमित ठाकरेंनी हनुमान चालीसा म्हणून दाखवावी..!!


पुणे–मुस्लिमांच्या अंगाला हातही लावू देणार नाही, आता त्यांची जबाबदारी आमची आहे. उच्चवर्णीय ब्राह्मण बहुजनांच्या पोरांना भडकावण्याचं काम करतात असा आरोप करत वंचित बहुजन आघाडी वेळ पडली तर रस्त्यावरही उतरेल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर यांनी दिला आहे.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात शिवतीर्थावरुन हिंदुत्वाचा मुद्दा मांडताना मिशिदीवरील भोंगांच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली. राज्य सरकारला मशिदीवरील भोंगे काढावेच लागतील. अन्यथा त्यांच्या भोग्यांसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावा, असा आदेशच राज ठाकरे यांनी मनसैनिकांना दिला. त्यावरून राजकीय वातावरण तापले असून वंचितनेही त्यात उडी घेतली आहे.

अधिक वाचा  अद्वैत सिद्धांताची भक्कम पायावर उभारणी करणारे आद्य श्री शंकराचार्य

राज ठाकरेंच्या वक्तव्याला पूर्णपणे पाठिंबा आहे, पण त्याआधी अमित ठाकरेंनी हनुमान चालीसा म्हणून दाखवावी, असं आव्हान सुजात आंबेडकर यांनी दिलं आहे. तिकडे अमित ठाकरेंना हनुमान चालीसा म्हणायला लावा. मला एखही बहुजन पोरगा तिकडे नको आहे. जो कुणी तिकडे हनुमान चालीसा म्हणायला जात असेल  त्यांनी टी शर्ट काढून जानवं दाखवा, मग हनुमान चालीसा म्हणा… असं आव्हान सुजात आंबेडकर यांनी दिलं आहे.

जर अमित ठाकरेंना हनुमान चालिसा येत नसेल तर इतरांच्या पोरांना सांगण्याचा हक्क तुम्हाला कुणी दिला? असा सवाल सुजात आंबेडकर यांनी केला आहे. महाविकास आघाडीनं पुरोगामीत्वाची चादर पांघरली आहे, तर संधी आहे राज ठाकरेंवर कारवाई करा, अशी मागणी त्यांनी केली.  मशिदीच्या बाजूला भोंगे लागतील या वक्तव्यावर आक्षेप आहे, कारवाई व्हायला हवी. संपत चाललेला पक्ष दंगलीवर उभा करु नका, असंही सुजात आंबेडकर यांनी म्हटलं आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love