पुणे-मराठा आरक्षणाच्या प्रश्नाबाबत सांभाजीराजे छत्रपती यांनी राज्यभर दौरा करून विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेतली आहे. आज त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर पत्रकार परिषदेमध्ये राज्य सरकारला पर्याय देत 6 जून पर्यन्त अल्टिमेटम दिला आहे. “६ जून रोजी शिवाजी महाराज छत्रपती झाले. आज मी घोषणा करतोय. ६ जूनपर्यंत आमच्या पाच मागण्या मान्य झाल्या नाहीत तर ६ जूनपासून रायगडावरुन आंदोलनाला सुरुवात करु, यावेळी आम्ही कोरोना बिरोना बघणार नाही”, असा थेट इशाराच छत्रपती संभाजी राजेंनी दिला आहे. दरम्यान, त्यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना भाष्य केले आहे. संभाजी राजे यांनी ६ जून पर्यंतची मराठा आरक्षणासाठी निर्णय घेण्यासंबंधी मुदत दिली आहे.पण या तारखेला अद्यापही ९ दिवस अवकाश आहे. यादरम्यान नक्कीच चांगला निर्णय घेता येईल, असे त्यांनी म्हटले आहे.
मराठा आरक्षण संदर्भात सगळं सुरळीत चाललेलं आहे. तुम्ही त्याला काही वेगळं वळण देऊ नका. संभाजी राजे यांनी ६ जून पर्यंतची मराठा आरक्षणासाठी निर्णय घेण्यासंबंधी मुदत दिली आहे.पण या तारखेला अद्यापही ९ दिवस अवकाश आहे. यादरम्यान नक्कीच चांगला निर्णय घेता येईल. मात्र, मराठा आरक्षणावरून काहींना त्यात राजकारणच करायचे आहे, संभाजी राजेंना नाही.अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विरोधकांना टोला लगावला आहे.
पवार म्हणाले, माझी आणि संभाजीराजेंची भेट दारातच झाली. आम्ही एकमेकांना फक्त नमस्कार केला. पण राज्य सरकारने मराठा आरक्षणासंबंधी पुढाकार घेवुन दिलीप भोसले जे अलाहाबाद हाय कोर्टाचे चीफ जस्टीस आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे. ते आता यावर काम करत आहेत.
दरम्यान, काही कारण नसताना काहीजण म्हणतात, आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. पण कसलं आंदोलन, आणि कशासाठी पाठिंबा? अशा शब्दात अजित पवारांनी चंद्रकांत पाटलाच्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंब्याबाबतच्या वक्तव्याचा समाचार घेतला. परंतू नंतर आता दादांचं ऐकायलाच पाहिजे. कारण मी, राजेश टोपे आम्ही सगळे मराठा समाजातले आहोत, आम्हाला पण आता रस्त्यावर उतरायला हवे असे ते म्हणाले.