महाराज… तुमच्या नजरेतलं स्वराज्य मला घडवायचंय : संभाजीराजे नक्की काय करणार?

पुणे- राज्यसभेची सहावी जागा अपक्ष म्हणून लढणार आणि त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी पाठिंबा द्यावा अशी इच्छा व्यक्त केलेल्या संभाजीराजे छत्रपती यांच्या शिवसेनेकडून निराशा पदरी पडली. त्यामुळे संभाजीराजे नक्की काय करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच त्यांनी आज सकाळी एक ट्वीट करून त्यांच्या भूमिकेबद्दल काहीसा सस्पेन्स निर्माण केला आहे. आपली कटिबद्धता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांशी आहे […]

Read More

राज्यसभेची निवडणूक अपक्ष लढवणार- संभाजीराजे छत्रपती : ‘स्वराज्य’ संघटनेची केली घोषणा

पुणे-मी कोणत्याही पक्षात जाणार नाही. परंतु, या वर्षीची राज्यसभेची निवडणूक मी नक्कीच लढवणार आहे. ही निवडणूक मी अपक्ष म्हणून लढवणार आहे, असे स्पष्ट करत माझ्या कामाची दखल गेऊन सर्व पक्षीय नेत्यांनी मला राज्यसभेत पाठवावं असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. दरम्यान, आज ‘स्वराज्य’ या संघटनेची स्थापना केल्याची घोषणाही त्यांनी केली. ही संघटना उद्या राजकीय […]

Read More

मराठा आरक्षणसाठी संभाजीराजेंनचा आझाद मैदानावर उपोषणाला बसण्याचा इशारा

पुणे–मी सुद्धा आता तेच तेच बोलून थकलो असल्याचे म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीवरुन होत असलेल्या विलंबाबद्दलची नाराजी मराठा समाजाच्या राज्यस्तरीय बैठकीत व्यक्त केली. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आझार मैदानावर लाक्षणिक किंवा बेमुदत उपोषण करण्याची घोषणा संभाजीराजेंनी केली आहे. तर नांदेड येथे २० ऑगस्ट रोजी मूक आंदोलन होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. पुण्यात आज मराठा […]

Read More

मराठा आरक्षण: केंद्र सरकारने वटहुकूम काढून घटनादुरुस्ती करावी- संभाजीराजे छत्रपती

पुणे – मराठा आरक्षणाबाबत १०२ वी घटनादुरूस्तीनुसार राज्याचे अधिकार अबाधित आहेत, अशी पुनर्विचार याचिका केंद्र सरकारकडून सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. दुर्दैवाने ती काल फेटाळली आहे. याचा अर्थ असा होतो, की राज्याला अधिकार राहिलेले नाहीत. त्यामुळे आता पुनर्विचार याचिकेचा विषयच उद्भवत नाही, अशी प्रतिक्रिया खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी आता घटनादुरुस्तीशिवाय […]

Read More

मराठा आरक्षणाच्या आंदोलनात महाविकास आघाडीतील नेते भूमिका मांडतील – अजित पवार

पुणे- मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर उद्या (दिनांक १६ ) कोल्हापूर मध्ये होणाऱ्या आंदोलनात महाविकास आघाडीतील नेते भूमिका मांडतील असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. राज्यकर्त्यांनी बोलावे अशी मागणी होते आहे त्यामुळे कोल्हापूरमध्ये आघाडीचे तिथले पालकमंत्री तसेच आमदार बाजू मांडतील असे अजित पवार म्हणाले. दरम्यान, जुलै महिन्यात विधिमंडळाचे अधिवेशन आहे. त्यामधे मराठा आरक्षणाबाबत चर्चा होईल असेही त्यांनी […]

Read More

लोकांमधे जाऊन आंदोलन करावे लागते, संभाजीराजेंमध्ये ती धग नाही – नारायण राणे

पुणे: जिल्हे फिरून  आणि भेटी घेऊन आरक्षण मिळत नाही.त्यातून पुढारपण देखील मिळत नाही. ते राजे आहेत म्हणून त्यांना खासदारकी दिली. आता त्यांनी राजीनामा देऊ नये. संभाजी राजे रायगडावरून आपली भूमिका मांडणार आहेत. रायगडावर आहे कोण? लोकांमधे जाऊन आंदोलन करावे लागते. संभाजीराजेंमध्ये ती धग नाही अशी टीका भाजपचे नेते खासदार नारायण राणे यांनी खासदार संभाजीराजे छत्रपती […]

Read More