We give as much funds as we want, just press the button in the EVM machine as well

निवडून येणाऱ्यालाही माहीत आहे कोण कोणामुळे निवडून आले – अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा

महाराष्ट्र राजकारण
Spread the love

Ajit Pawar – निवडून येणाऱ्याला ही माहीत आहे कोण कोणामुळे निवडून आले आहे, अन् निवडून आणणाऱ्यालाही माहीत आपण कोणाला निवडून आणले आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांनी राज्य महिला आयोगाच्या (State Commission for Women) अध्यक्षा रूपाली चाकणकर(Rupali Chakankar) यांच्या विधानाला दुजोरा देत सुप्रिया सुळे(Supriya Sule) यांच्यावर निशाणा साधला.(Ajit Pawar targets Supriya Sule)

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर(Rupali Chakankar) यांनी सुप्रिया सुळे(Supriya Sule) या अजित दादांमुळे खासदार झाल्या आहेत, दादा नसल्यामुळे नवरा मुलांना सोडून बारामतीमध्ये तळ ठोकावा लागत आहे, अशी टीका केली होती. रुपाली चाकणकर यांच्या या व्यक्तव्याला दुजोरा देत अजित पवार यांनी वरील प्रतिक्रिया व्यक्त केली.

उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर होते. विविध प्रकल्प आणि कामाच्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान त्यांना प्रश्न विचारण्यात आला की अजित पवारांमुळेच सुप्रिया सुळे या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत? या बाबत अजित पवार म्हणाले “निवडून येणाऱ्याला ही माहीत आहे, कोण कोणा मुळे निवडून आले आहे आणि निवडून आणणाऱ्यालाही माहिती कोण कोणामुळे निवडून आले” असे म्हणत अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांचा नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.

तुम्ही कशाकरिता खपल्या उकरुन काढायचं काम करता?

आमदार आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra AAVHAD) यांनी, ‘श्रीराम (Shriram) हे मांसाहारी होते’ असे वक्तव्य केले होते. यावरुन रोहित पवार(Rohit Pawar)यांनी आव्हाड यांना घरचा आहेर दिला होता. त्यावर आव्हाड यांनीही रोहित पवार हे राजकारणात अजून नवखे असल्याचा टोला लगावला होता. जितेंद्र आव्हाड आणि रोहित पवार यांच्यातील या वादाबाबत अजित पवार यांना विचारले अजित पवार यांनी  ‘नो कमेंटस’ मला त्यामध्ये काहीही बोलायचं नाही. तुम्ही कशाकरिता खपल्या उकरुन काढायचं काम करता?, अशा शब्दांत प्रतिक्रिया व्यक्त केली.

जितेंद्र आव्हाड यांनी अलीकडेच अजित पवार हे राष्ट्रवादीत असताना दादागिरी करायचे, असा आरोप केला होता. याबद्दल विचारणा केली असता अजितदादांनी म्हटले की, ‘त्याच्याबद्दल आमचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. मी आज सकाळी सहा वाजता कामाला सुरुवात केली आहे. मी कामाचा माणूस आहे. मी असली आलतू फालतू उत्तर द्यायला बांधील नाही. तुम्ही मला कामाचे प्रश्न विचारा असे म्हणत याबाबत बोलण्याचे टाळले.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *