इंदिरा आयव्हीएफतर्फे बाणेर, पुणे येथे नव्या फर्टिलिटी सेंटरचे उद्घाटन; पुण्यातील ७ वे क्लिनिक ठरले सुरू

Indira IVF fertility center Baner Pune
Indira IVF fertility center Baner Pune

पुणे(प्रतिनिधी)–भारतातील अग्रगण्य फर्टिलिटी सर्व्हिस प्रोव्हायडर्सपैकी एक असलेल्या इंदिरा आयव्हीएफने बाणेर, पुणे येथे आपल्या नव्या फर्टिलिटी सेंटरचे दिमाखात उद्घाटन केले आहे. ग्रुपचे पुण्यातील हे ७ वे क्लिनिक असून, महाराष्ट्रातील वेगाने वाढणाऱ्या रहिवासी भागांमध्ये राहणाऱ्या लोकांपर्यंत आणि जोडप्यांपर्यंत संपूर्ण फर्टिलिटी केअर आणि रिप्रोडक्टिव्ह हेल्थकेअरची सुविधा सुलभतेने पोहोचवण्याच्या दिशेने हे आणखी एक महत्त्वाचे पाऊल ठरले आहे.

हे नवीन सेंटर सेकंड फ्लोअर, ला कमर्शियल, बाणेर मेन रोड, रिजन्सी कॉस्मॉस बिल्डिंगजवळ, ट्रेंड्स स्टोअरजवळ, पुणे येथे सुरू करण्यात आले आहे. फर्टिलिटी आणि असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह सर्व्हिसेसच्या संपूर्ण आधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेले हे केंद्र रुग्णांना इंदिरा आयव्हीएफच्या स्टँडर्ड क्लिनिकल प्रोटोकॉल, प्रगत लॅबोरेटरी सिस्टम आणि उच्च दर्जाच्या पेशंट केअर प्रोसेसेसच्या माध्यमातून खात्रीशीर उपचार सेवा उपलब्ध करून देणार आहे. या उद्घाटन समारंभाला विशेष पाहुणे म्हणून झोनल बिझनेस डायरेक्टर अँड सेंटर हेड इंदिरा आयव्हीएफ पुणे डॉ. अमोल लुंकड, स्पेशल गेस्ट डॉ. शशिकांत आव्हाड (स्त्रीरोगतज्ज्ञ व आयव्हीएफ विशेषज्ञ, इंदिरा आयव्हीएफ, पिंपरी-चिंचवड, पुणे), तसेच एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अँड सेंटर हेड इंदिरा आयव्हीएफ बाणेर डॉ. जयदीप काळे यांच्यासह अनेक वरिष्ठ वैद्यकीय व्यावसायिक आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा  धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर राजकीय भूमिकेबाबत घेणार मोठा निर्णय, कार्यकर्त्यांशी करणार चर्चा

या प्रसंगी आपल्या विस्तारयोजनेवर प्रकाश टाकताच इंदिरा आयव्हीएफ लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर नितीज मुर्डिया यांनी सांगितले की, पुणे हे एक महत्त्वाचे हेल्थकेअर हब म्हणून विकसित झाले असून इथे ऑर्गनाइज्ड फर्टिलिटी सर्व्हिसची मागणी वेगाने वाढते आहे. बाणेर येथील आमचा हा विस्तार सेंटर्सच्या मोठ्या नेटवर्कच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोच वाढवण्याच्या आमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे प्रतीक आहे. त्याचबरोबर, आम्ही प्रत्येक इंदिरा आयव्हीएफ क्लिनिकमध्ये क्लिनिकल प्रोटोकॉल, लॅबोरेटरी सिस्टम आणि रुग्णांच्या केअरचा समान उच्च स्टँडर्ड राखण्यासाठीही पूर्णपणे कटिबद्ध आहोत.

झोनल बिझनेस डायरेक्टर अँड सेंटर हेड इंदिरा आयव्हीएफ पुणे डॉ. अमोल लुंकड यांनी माहिती दिली की, गेल्या काही वर्षांत फर्टिलिटीबाबत समाजात जागरूकता बऱ्यापैकी वाढली असून अधिकाधिक जोडपी आता सुरुवातीच्या टप्प्यातच वैद्यकीय सल्ला घेण्यासाठी पुढे येत आहेत. बाणेर येथील हे नवीन सेंटर याच सकारात्मक बदलाला बळ देण्यासाठी सुरू करण्यात आले असून, हे केंद्र स्टँडर्ड क्लिनिकल आणि लॅबोरेटरी प्रॅक्टिसच्या माध्यमातून स्ट्रक्चर्ड फर्टिलिटी तपासणी, एव्हिडन्स बेस्ड ट्रीटमेंट प्लॅनिंग आणि निरंतर केअरची सुविधा उपलब्ध करून देणार आहे.

अधिक वाचा  Kharadi Rave Party case : एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ जणांना पोलीस कोठडी, राजकीय षडयंत्राचा आरोप

स्त्रीरोगतज्ज्ञ व आयव्हीएफ विशेषज्ञ डॉ. शशिकांत आव्हाड यांनी यावेळी स्पष्ट केले की, फर्टिलिटी ट्रीटमेंट ही केवळ काही वैद्यकीय प्रोसीजर्सपुरती मर्यादित नसते. यासाठी प्रत्येक रुग्णाच्या क्लिनिकल प्रोफाइलनुसार योग्य काउन्सेलिंग, स्पष्ट चर्चा आणि पर्सनलाइज्ड ट्रीटमेंट प्लॅनिंगची नितांत गरज असते. बाणेर सेंटरमध्ये आमचे मुख्य उद्दिष्ट असे पोषक वातावरण उपलब्ध करून देणे आहे, जिथे रुग्णांना त्यांच्या फर्टिलिटी प्रवासाच्या प्रत्येक टप्प्यावर संपूर्ण आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळू शकेल.

एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर अँड इंदिरा आयव्हीएफ बाणेर सेंटर हेड डॉ. जयदीप काळे यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, बाणेरमध्ये हे सेंटर सुरू झाल्यामुळे आम्ही रुग्णांना त्यांच्याच जवळच्या परिसरात उत्कृष्ट सेवा देत आहोत. यामुळे त्यांना उपचारांसाठी दूरच्या शहरांमध्ये प्रवास करण्याची गरज उरणार नाही आणि त्यांचे उपचारही विनाअथळा सातत्याने सुरू राहतील. आमची तज्ज्ञ टीम परस्पर समन्वयाने पेशंट-केंद्रित पद्धतीने पुरुष आणि महिलांच्या फर्टिलिटीच्या सर्वसमावेशक तपासणीत मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे, ज्यामध्ये उच्च दर्जाची क्लिनिकल तज्ज्ञता आणि आपुलकीने केली जाणारी पेशंट केअर यांचा समावेश आहे.

अधिक वाचा  गंगा नेबुला सोसायटीच्या वतीने गणेशोत्सव उत्साहात साजरा

या नव्या केंद्राच्या उद्घाटनासोबतच इंदिरा आयव्हीएफने आपला राष्ट्रीय विस्तार यशस्वीपणे सुरू ठेवला असून, हे सेंटर आता संपूर्ण भारतातील तब्बल २०० क्लिनिकांच्या विशाल नेटवर्कमध्ये जोडले गेले आहे. बाणेर येथील हे नवीन सेंटर पुरुष आणि महिला दोघांच्याही वंधत्वासंबंधी सर्व प्रकारच्या समस्यांसाठी फर्टिलिटी आणि असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह सर्व्हिसेस देणार असून, ज्यांना प्रगत स्टँडर्ड लॅबोरेटरी प्रक्रिया, इलेक्ट्रॉनिक मेडिकल रेकॉर्ड्स आणि अत्याधुनिक पेशंट सेफ्टी सिस्टमचे भक्कम समर्थन लाभले आहे.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love