सर्व पक्ष समभाव यावर माझा विश्वास आहे : उदयनराजेंच्या या व्यक्तव्याने राजकीय चर्चांना उधाण

राजकारण
Spread the love

पुणे-खासदार उदयनराजे भोसले यांनी आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन सुमारे पाऊण चर्चा केली. या भेटीनंतर प्रसारमध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी, “शिवाजी महाराजांनी जशी सर्व धर्म समभावाची भूमिका मांडली होती तशीच माझी भूमिका आहे. सर्व पक्ष समभाव यावर माझा विश्वास आहे”,असे विधान केल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

या भेटीत अजित पवार यांनी उदयनराजे यांनी मांडलेले साताऱ्यातील अनेक प्रश्नांचा फोनाफोनी करून तिथल्या तिथे निकालही लावला. मात्र, बऱ्याच दिवसानंतर दोन्ही नेते एकमेकांना भेटल्याने या भेटीकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या. या भेटीनंतर उदयनराजे भोसले काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. उदयनराजे मीडियासमोर येताच तुम्ही राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यावर उदयनराजे यांनी सर्वपक्षीय समभाव अशी सूचक प्रतिक्रिया देऊन सर्वांना बुचकळ्यात पाडलं. त्यामुळे उदयनराजे खरंच राष्ट्रवादीत जाणार का? अशी चर्चा रंगली आहे.

या भेटीत नगरपालिकेच्या हद्दवाढी नंतर सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासंदर्भात चर्चा झाली. सातारा नगरपरिषद ही ‘अ’ वर्ग दर्जाची नगरपरिषद आहे. नुकतेच हद्दवाढ झालेल्या भागाचे सर्वेक्षण करण्यात आलेय यात या भागात रस्ते, लाईट, पथदिवे आणि ओपन स्पेस विकसित करण्यासाठी सुमारे ४८५० लाख एवढ्या निधीची गरज भासणार आहे. हा निधी नगरपालिकेला मिळावा म्हणून खासदार उदयनराजें भोसले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेवून निधी उपलब्ध करुन देण्यासंदर्भात विनंती केली.

50% LikesVS
50% Dislikes

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *